विकसित भारतासाठी तरुणांनी मतदानाचा हक्क बजावावा : खासदार धनंजय महाडिक

राजर्षी शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रम

कोल्हापूर : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘विकसित भारत युवा संवाद’ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशिक्षणार्थींना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिकत्व आणि विकसित भारताच्या उभारणीत शिक्षणाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संविधानाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचा वापर करून नागरिकांना आपल्या पसंतीचे लोकप्रतिनिधी निवडता येतात. त्यामुळे तरुणांनी जबाबदार नागरिक म्हणून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांनी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. त्याचबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी शुभांग शिरोडकर यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. मतदार यादीतील नावनोंदणी, तपशीलांची पडताळणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांनी ‘माय भारत’ पोर्टलच्या माध्यमातून युवकांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधी आणि उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे अधीक्षक गणेश भोसले यांनी लोकशाही मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करून प्रशिक्षणार्थींना लोकशाहीची शपथ दिली. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींनी निवडणूक प्रक्रिया, एसआयआर मोहीम आणि स्टार्टअपविषयी विचारलेल्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी उत्तरे दिली. यावेळी संस्थेचे प्राचार्य महेश आवटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सतीश माने, अभिजीत पोवार, शिल्पनिदेशक, गटनिदेशक, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...