बड्या कंपन्यांची महाराष्ट्राकडे पाठ, अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि हजारो नोकऱ्या हातातून निसटल्या!

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेमिकंडक्टर कंपन्यांसाठी भारताची दारे उघडली असून, त्यात फॉक्सकॉनसह अनेकांनी गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रकल्प सुरू करण्याचे काम हातीही घेतले आहेत. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाटेवर होते. बोलणीही झाली, पण बड्या कंपन्या गमावून महाराष्ट्र अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो हातांना काम मिळवून देण्याच्या संधीला मुकला आहे.

महाराष्ट्र सरकारबरोबर करार आणि तामिळनाडूत गुंतवणूक

२०१५ मध्ये तैवानच्या फॉक्सकॉनसोबत ५ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. तो सुवर्णसंधी ठरला असता, पण गुंतवणूक प्रत्यक्षात उतरली नाही, अशाच तैवानच्या अनेक कंपन्या महाराष्ट्राच्या मार्गावरून इतर राज्यांत खासकरून तामिळनाडूत गेल्या आहेत. २०२३ मध्येही पाऊ चेन या फुटवेअर बनविणाऱ्या तैवानच्या कंपनीने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला होता. पण पाऊ चेनने तामिळनाडूत गुंतवणूक केली.

तामिळनाडूने बाजी का मारली ?

तैवान व दक्षिण कोरियन कंपन्यांसाठी उद्योग सहाय्यक आणि संस्कृती अनुकूल सल्लागार नेमले. विशेष आर्थिक क्षेत्र, “प्लग-अॅड-प्ले’ तयार भूखंड निर्माण केले. ‘Guidance Tamil Nadu’ नावाचे सशक्त गुंतवणूक प्राधिकरण तयार केले. सुलभ परवाना प्रक्रिया उद्योग मेत्री जोडली. उत्पादन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलद अंमलबजावणी केली. पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या, वेगवेगळे क्लस्टर जलद गतीने निर्माण केले. जमिनी उपलब्ध करून दिल्या, तैवान क्लस्टर निर्माण केले. भारतातील सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य

तामिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य राहिले असून, वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये ९.५६ अब्ज डॉलर्स इतकी निर्यात करत तामिळनाडूने राष्ट्रीय निर्यातीच्या ३२.८४% इतका वाटा उचलला. मागील वर्षाच्या तुलनेत ही निर्यात ७८% नी वाढली आहे. फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, सॅलकॉम्प, 3 पेगाट्रॉन यांसारख्या भारतातील पंधराहून अधिक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार कंपन्या तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत.

UPI च्या २ हजार रुपयांवरील व्यवहारांवर ३०० रुपयांपर्यंत शुल्क; NPCI ची घोषणा

UPI च्या २ हजार रुपयांवरील व्यवहारांवर ३०० रुपयांपर्यंत शुल्क; NPCI ची घोषणा

१५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहार मात्र यापुढेही मोफत नवी दिल्ली : UPI व्यवहारांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मंगळवारी जाहीर केले की, १५ ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा...

OpenAI ने वित्तीय क्षेत्रासाठी लाँच केले ChatGPT; डेटा संच, आर्थिक मॉडेलिंग आणि एंटरप्राइज सुरक्षा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर

OpenAI ने वित्तीय क्षेत्रासाठी लाँच केले ChatGPT; डेटा संच, आर्थिक मॉडेलिंग आणि एंटरप्राइज सुरक्षा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर

वॉशिंग्टन डीसी : OpenAI ने वित्तीय संस्थांसाठी खास तयार करण्यात आलेली ChatGPT ची वित्तीय सेवा-केंद्रित आवृत्ती लाँच केली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये प्रीमियम वित्तीय डेटा संच, आर्थिक मॉडेलिंगची साधने आणि एंटरप्राइज स्तरावरील सुरक्षा नियंत्रणे एकाच ठिकाणी उपलब्ध करून...

मराठा उद्योजकांची एकजुटीची हाक; कोल्हापूर एमईए चाप्टरच्या सदस्यत्व नोंदणीला सुरुवात

मराठा उद्योजकांची एकजुटीची हाक; कोल्हापूर एमईए चाप्टरच्या सदस्यत्व नोंदणीला सुरुवात

उद्योग-व्यवसाय क्षेत्रात मराठा समाजाची ताकद वाढविण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याचे आवाहन कोल्हापूर : उद्योग-व्यवसायातील संधींचा सामूहिकपणे लाभ घेण्यासाठी मराठा उद्योजकांनी परस्परांमध्ये संवाद आणि विश्वास वाढवून एकमेकांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे. संघटित...

सुभाष चंद्रांविरोधात CBIकडून गुन्हा दाखल; १,३२२ कोटींच्या कर्जफसवणुकीचा आरोप

सुभाष चंद्रांविरोधात CBIकडून गुन्हा दाखल; १,३२२ कोटींच्या कर्जफसवणुकीचा आरोप

नवी दिल्ली : ‘झी’ समूहाचे संस्थापक आणि ‘एस्सेल समूहा’चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून (LICHFL) घेतलेल्या कर्जामध्ये १,३२२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची कथित फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सुभाष...

‘माविम’च्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करु

‘माविम’च्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करु

जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख;सांगरुळमधील कोल्हापुरी चप्पल युनिटचे उद्घाटन कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सांगरुळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन...

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर

लवकरच कर्नाटकात होणार विस्तार : वार्षिक सर्वसाधारण सभेत सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती कोल्हापूर : उज्वल भविष्यासाठी योग्य आर्थिक बचत महत्वाची असते. सर्वसाधारण कुटूंबातील महिलांना एकदम मोठया रकमेच्या ठेवी ठेवणे शक्य नसते. त्यामुळे पिग्मीच्या स्वरूपात दररोज बचत करावी,...