डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्ड

-‘एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह’मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान
-स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचाही गौरव

कोल्हापूर: शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील ‘एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी – २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागास ‘बेस्ट परफॉर्मिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले. यावेळी एड्युस्किल्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शुभजित जगदेव प्रमुख उपस्थित होते.

एड्युस्किल्स फाउंडेशन हे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, उद्योगाभिमुख शिक्षण, व्हर्च्युअल इंटर्नशिप, सर्टिफिकेशन तसेच प्राध्यापकांच्या कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणारे व्यासपीठ आहे. एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह देशभरातील शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होतात. कौशल्याधारित शिक्षण, उद्योग–शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणाऱ्या संस्थात्मक उपक्रमांचा या माध्यमातून गौरव केला जातो.

एड्युस्किल्स फाऊंडेशनसोबत केलेल्या सामंजस्य कराराच्या (एमओयू) माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गुगल, मायक्रोसॉफ्ट, जुनिपर नेटवर्क्स यांसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सहकार्याने क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिटिक्स आणि आयओटी यांसारख्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचे मोफत प्रशिक्षण व सर्टिफिकेशन मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रात सुमारे तीन महिन्यांची विनामूल्य व्हर्च्युअल इंटर्नशिप मिळून प्रकल्पाधारित कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, सहभागी विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्याची उल्लेखनीय कामगिरी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने नोंदवली आहे. विद्यापीठाला मिळालेल्या या दोन्ही पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...