सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटील

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ 

कोल्हापूर: वैद्यकीय क्षेत्र आरोग्य आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे क्षेत्र आहे असून रुग्णसेवेचा माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध होते. या क्षेत्रातील सखोल ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी एक आदर्श डॉक्टर बनावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. हॉटेल सयाजी येथे आयोजित डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ ‘दिक्षारंभ’ मध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अनिता गुणे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व चांगल्या सुविधा देण्यावर आमचा नेहमीच भर आहे. अनुभवी व तज्ज्ञ स्टाफ, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे मेडिकल कॉलेज आज देशात २३ व्या स्थानी पोहोचले आहे. जिल्ह्यात तब्बल ४९५ डॉक्टर हे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये गोरगरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. यामुळे रुग्णांना दिलासा मिळतोच, शिवाय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभव शिक्षण मिळते. संस्थेमध्ये उपलब्ध जागतिक दर्जाच्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करा. चांगले शिका, नवीन गोष्टींचा अनुभव घ्या आणि एक उत्तम माणूस आणि संवेदनक्षम डॉक्टर बना. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मानसिक धीर देऊन त्यांचा विश्वास संपादन करा आणि भविष्यात आदर्श डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करा.

विश्वस्त वृषाली पृथ्वीराज पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी केवळ चांगले गुण मिळवण्यावरच भर न देता ज्ञान, शिस्त, मुल्य आणि संस्कारांची जोपासना करावी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, शिक्षकांचा आदर व ध्येयावर लक्ष ठेवून वाटचाल करावी. विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र केवळ व्यवसाय नसून, ती समाजाप्रती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. या क्षेत्रात काम करताना डॉक्टरांनी प्रामाणिकपणा आणि मूल्यांची जपणूक करून रुग्णांच्या मनामध्ये आपल्याविषयी ठाम विश्वास निर्माण केला पाहिजे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणताही मानसिक दबाव न घेता योग्य नियोजन करून अभ्यास करावा. उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करून चांगला श्रोता बनावे आणि नेहमी नैतिक मूल्यांचे पालन करा. कम्युनिटी लर्निंगसाठी समाजात जाऊन काम करावे. डॉक्टर बनण्याचा हा शैक्षणिक प्रवास अधिक संस्मरणीय करा. अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यानी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सर्व विद्यार्थी त्यांच्या मेहनत आणि कष्टाच्या जोरावर येथे पोहोचले आहेत. हेच विद्यार्थी भविष्यात समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणारे उत्तम डॉक्टर घडतील, याचा विश्वास वाटतो.

लेफ्टनंट कर्नल डॉ. ओमप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना हॉस्टेल व्यवस्थापन व कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. उप अधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांनी अभ्यासक्रम रचना, नियोजन याबाबत माहिती दिली. यावेळी जागतिक टॉप संशोधकांच्या यादीत स्थान मिळवणारे डॉ सी. डी. लोखंडे, डॉ. पी. सी. पाटील, डॉ विश्वजित खोत, डॉ जयंत गुंजकर डॉ. अर्पिता तिवारी, डॉ. उमाकांत पाटील, डॉ. प्रवीण पवार तसेच मेडिकल कॉलेज हॉस्टेल उभारणीमध्ये विशेष योगदान देणारे अजय डोईजड, प्रवीण झोले, प्रकाश नाईक यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अनिता गुणे यांनी आभार मानले यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, यांच्यासह मान्यवर, नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Amaron

Amaron

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...