दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

सात देशांत फराळ व भेटवस्तू पाठविण्याची सुविधा; भारतीय डाक विभागाचे आवाहन

कोल्हापूर : दिवाळीनिमित्त घरगुती फराळ, मिठाई, भेटवस्तू आणि स्नेहाच्या शुभेच्छा देशाच्या विविध भागांसह परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांना टपाल सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनवरील RMS/BPC पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध असून, नागरिकांना आपल्या सोयीनुसार पार्सल बुक करता येणार आहे.

देशांतर्गत पार्सल सेवेद्वारे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये दिवाळीचा फराळ, भेटवस्तू आणि इतर पात्र वस्तू पाठविता येतात. तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला दिवाळीच्या शुभेच्छांसह भेटवस्तू पाठविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविताना संबंधित देशाचे आयात नियम, खाद्यपदार्थांवरील निर्बंध आणि भारतीय डाक विभागाच्या अटींची माहिती घेऊनच बुकिंग करावे.

दिवाळीच्या काळात पार्सल पाठविण्यासाठी होणारी गर्दी आणि वेळेची अडचण लक्षात घेता, कोल्हापूर RMS पोस्ट ऑफिसमधील 24 तास बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. व्यापारी, व्यावसायिक, गृहउद्योग चालक, महिला बचत गट आणि फराळ उत्पादकांनाही आपल्या उत्पादनांची देशभरात तसेच परदेशात पाठवणी करण्यासाठी या सेवेचा उपयोग करता येणार आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून घरगुती फराळ आणि भेटवस्तू प्रियजनांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन रेल मेल सेवा अधीक्षक गुरुदास मोंडे यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय पार्सलचे दर :
युएसए- 2 किलोसाठी- 2083, 5 किलोसाठी – 5510, 10 किलोसाठी -9050, 15 किलोसाठी – 12590

युके- 2 किलोसाठी- 1387, 5 किलोसाठी – 4337, 10 किलोसाठी -6461, 15 किलोसाठी – 8585

जर्मनी- 2 किलोसाठी- 1440, 5 किलोसाठी – 3988, 10 किलोसाठी -5876, 15 किलोसाठी – 7764

युएई/ दुबई – 2 किलोसाठी- 1982, 5 किलोसाठी – 2548, 10 किलोसाठी -3492, 15 किलोसाठी – 4436

ऑस्ट्रेलिया- 2 किलोसाठी- 2538, 5 किलोसाठी – 6485, 10 किलोसाठी -11913, 15 किलोसाठी – 17341

सिंगापूर- 2 किलोसाठी- 908, 5 किलोसाठी – 2844, 10 किलोसाठी -4378, 15 किलोसाठी – 5912

रशिया- 2 किलोसाठी- 1669, 5 किलोसाठी – 3918, 10 किलोसाठी -6750, 15 किलोसाठी – 9682

2 किलोचे ITPS सेवेव्दारे व 5,10 व 15 किलोचे पार्सल EMS सेवेव्दारे पाठवण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी सचिन गायकवाड, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, कोल्हापूर RMS/BPC पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, कोल्हापूर–416001 यांच्याशी मोबाईल : 9579096100/9921834177 किंवा कार्यालयीन दूरध्वनी : 0231-2657400/2655222 वर संपर्क साधावा.

कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

रॅपिडो अ‍ॅपचा वापर टाळण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रॅपिडो (Rapido) अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर...

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई : भारतीय शेअर बाजारात रेमंड लिमिटेडच्या शेअरने २०२६ मध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुमारे ४२५ रुपयांवर असलेला हा शेअर आता १,०५० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे १५० टक्क्यांची वाढ झाली आहे....

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती; १० लाख टन आयातीला अपेक्षित प्रतिसाद नाही, हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची टंचाई निर्माण होऊन दरात मोठी वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्याच्या मुदतीत ३१...

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

नवी दिल्ली : भारतात 2035 पर्यंत अंदाजे 1.9 लाख ते 2.1 लाख अतिरिक्त हॉटेल खोल्यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित सुमारे 120 ते 125 दशलक्ष चौरस फूट नवीन रिअल इस्टेट विकसित करावी लागेल. देशांतर्गत पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि प्रीमियम...

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा विक्रीला मंजुरी; भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेतील केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) एकूण ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडास्थित फेअरफॅक्स...

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत

नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे घसरते मूल्य आणि शेअर बाजारातील कररचनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेसह बाह्य घटकांमुळे रुपयावर दबाव वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच,...