कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

रॅपिडो अ‍ॅपचा वापर टाळण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रॅपिडो (Rapido) अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात रॅपिडो अ‍ॅपद्वारे व्यवसाय करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून कोणतीही परवानगी किंवा आदेश देण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर टाळावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ९३ नुसार प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅग्रीगेटरकडे सक्षम प्राधिकरणाचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. तसेच ‘महाराष्ट्र मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर नियम, २०२५’ हे १५ जुलै २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आले असून, बाइक टॅक्सी सेवांसाठी लागू असलेल्या स्वतंत्र नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे. अ‍ॅपशी संलग्न वाहनांची वैध नोंदणी, आवश्यक प्रवासी वाहतूक परवाना, विमा, योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) यांसारखी कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे. यासोबतच वाहनचालकांची पात्रता, वाहनांची सुरक्षितता, प्रवाशांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे आणि तक्रार निवारण यंत्रणा याबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रॅपिडो अ‍ॅपद्वारे अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास संबंधित चालकाचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि वाहन निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.

रॅपिडो अ‍ॅपद्वारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्यवसाय करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कोणतीही परवानगी किंवा आदेश दिलेले नाहीत. वैध परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक करणे किंवा मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास वाहनमालक, चालक अथवा अ‍ॅग्रीगेटरविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, अनधिकृत प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध करणे आणि अ‍ॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांवर लागू असलेल्या कायदे व नियमांची अंमलबजावणी करणे या उद्देशाने ही तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वाहनमालक, चालक आणि अ‍ॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी सर्व कायदे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई : भारतीय शेअर बाजारात रेमंड लिमिटेडच्या शेअरने २०२६ मध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुमारे ४२५ रुपयांवर असलेला हा शेअर आता १,०५० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे १५० टक्क्यांची वाढ झाली आहे....

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती; १० लाख टन आयातीला अपेक्षित प्रतिसाद नाही, हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची टंचाई निर्माण होऊन दरात मोठी वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्याच्या मुदतीत ३१...

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

नवी दिल्ली : भारतात 2035 पर्यंत अंदाजे 1.9 लाख ते 2.1 लाख अतिरिक्त हॉटेल खोल्यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित सुमारे 120 ते 125 दशलक्ष चौरस फूट नवीन रिअल इस्टेट विकसित करावी लागेल. देशांतर्गत पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि प्रीमियम...

दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

सात देशांत फराळ व भेटवस्तू पाठविण्याची सुविधा; भारतीय डाक विभागाचे आवाहन कोल्हापूर : दिवाळीनिमित्त घरगुती फराळ, मिठाई, भेटवस्तू आणि स्नेहाच्या शुभेच्छा देशाच्या विविध भागांसह परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांना टपाल सेवांचा...

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा विक्रीला मंजुरी; भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेतील केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) एकूण ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडास्थित फेअरफॅक्स...

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत

डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत

नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे घसरते मूल्य आणि शेअर बाजारातील कररचनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेसह बाह्य घटकांमुळे रुपयावर दबाव वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच,...