ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलेंडर महागला

मुंबई : सणासुदीच्या काळात अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली असतानाच आता गॅस सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ६२.५० रुपयांची वाढ केली आहे.

नवीन दरानुसार राजधानी दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलेंडरची किंमत ६२.५० रुपयांनी वाढून २ हजार ८१० रुपये झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये या सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याने या दरवाढीचा परिणाम व्यावसायिकांच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब आहे. सध्या १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत ९४१.५० रुपये, दिल्लीत ९४२ रुपये, चेन्नईत ९५७.५० रुपये, तर कोलकात्यात ९६८ रुपये आहे. कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीमुळे सणासुदीच्या काळात हॉटेल, खानावळ आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायाच्या खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 
कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

रॅपिडो अ‍ॅपचा वापर टाळण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रॅपिडो (Rapido) अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर...

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई : भारतीय शेअर बाजारात रेमंड लिमिटेडच्या शेअरने २०२६ मध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुमारे ४२५ रुपयांवर असलेला हा शेअर आता १,०५० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे १५० टक्क्यांची वाढ झाली आहे....

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती; १० लाख टन आयातीला अपेक्षित प्रतिसाद नाही, हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची टंचाई निर्माण होऊन दरात मोठी वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्याच्या मुदतीत ३१...

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

नवी दिल्ली : भारतात 2035 पर्यंत अंदाजे 1.9 लाख ते 2.1 लाख अतिरिक्त हॉटेल खोल्यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित सुमारे 120 ते 125 दशलक्ष चौरस फूट नवीन रिअल इस्टेट विकसित करावी लागेल. देशांतर्गत पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि प्रीमियम...

दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

सात देशांत फराळ व भेटवस्तू पाठविण्याची सुविधा; भारतीय डाक विभागाचे आवाहन कोल्हापूर : दिवाळीनिमित्त घरगुती फराळ, मिठाई, भेटवस्तू आणि स्नेहाच्या शुभेच्छा देशाच्या विविध भागांसह परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांना टपाल सेवांचा...

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा विक्रीला मंजुरी; भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेतील केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) एकूण ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडास्थित फेअरफॅक्स...