८ व १० नोव्हेंबर रोजी ओपीडी बंद; ९ व ११ नोव्हेंबर रोजी नियमित सुरू
कोल्हापूर : दिवाळी सणानिमित्त सार्वजनिक सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथील बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) कामकाजात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ८ व १० नोव्हेंबर रोजी ओपीडी बंद राहणार असून, ९ व ११ नोव्हेंबर रोजी ओपीडी नियमितपणे सुरू राहणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने ओपीडी बंद राहील. ९ नोव्हेंबर रोजी सोमवार आणि ११ नोव्हेंबर रोजी बुधवार या दिवशी बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. तसेच १० नोव्हेंबर रोजी मंगळवारी ओपीडी बंद राहणार आहे.

दरम्यान, रुग्णालयातील अपघात विभाग, सर्व वैद्यकीय सेवा, आंतररुग्ण विभाग (आयपीडी) तसेच तातडीच्या शस्त्रक्रिया सेवा २४ तास पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा अखंडितपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील नागरिक व रुग्णांनी ओपीडीच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार रुग्णालयात यावे, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे.







