खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला  जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांच्या संभाव्य खर्चाची पूर्वकल्पना मिळून वैद्यकीय खर्चाचे नियोजन करता येणार आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांनी महाराष्ट्र नर्सिंग होम नियमावली, २०२१ मधील अनुसूची तीनमध्ये नमूद सेवा व सुविधांचे दर प्रदर्शित करावेत. या नियमावलीनुसार क्लिनिकल आणि रुग्णालयीन सेवांचे दर दर्शनी भागात प्रदर्शित करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असावे. ते रुग्णालयाच्या आवारातील महत्त्वाच्या, स्पष्टपणे नजरेस पडणाऱ्या आणि सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणी लावावे. रुग्णालयाने दरांमध्ये बदल केल्यास दरपत्रक तात्काळ अद्ययावत करावे.

देयकांबाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी रुग्णांना लागू सेवा शुल्क आणि विविध पॅकेजच्या दरांची पुरेशी माहिती द्यावी. नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दरपत्रक आणि शुल्काबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. मेडिकल व्हिसा किंवा आयुष व्हिसावर भारतात उपचारांसाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी त्यांच्यासाठी लागू असलेले विशेष पॅकेज दरही स्पष्टपणे प्रदर्शित करावेत.

रुग्णालयांची नोंदणी, नियमन आणि देखरेख करणाऱ्या सक्षम प्राधिकरणांनी दरप्रदर्शनाच्या नियमांच्या अनुपालनाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक त्यांच्या कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालये व अन्य वैद्यकीय आस्थापनांच्या निदर्शनास आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

Amaron

Amaron

 

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत...

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील...

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक...

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

‘मॅपकॉन-२०२६’ परिषदचे डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवसीय परिषदेत एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्टचा सहभाग कोल्हापूर :  वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची...

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:  राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात...

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात

-शुक्रवार २ ऑक्टोबर पासून प्रारंभ -डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज,पॅथॉलॉजी विभागाकडून आयोजन -तीन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर होणार विचार मंथन कोल्हापूर : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’...