डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंका

-‘अकॅडमी रिसर्च इंडेक्स’मध्ये ७ संशोधकांना स्थान
-डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्या स्थानी

कोल्हापूर : शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे (Academic Research Index) जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक ‘टॉप १००० संशोधक’ क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिन रिसर्चच्या ७ संशोधकांनी जागतिक यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. ‘एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस’ या विषयात डॉ सी. डी. लोखंडे यांनी जागतिक क्रमवारीत २२ वे, तर देशात प्रथम स्थान पटकावले असून संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी जगात २४ वे तर देशात तिसरे स्थान मिळवले आहे. याशिवाय डॉ. उमाकांत एम. पाटील यांनी ७६ वे स्थान मिळवले असून डॉ. विश्वजीत एम. खोत (३२७), डॉ. जयवंत एल. गुंजकर (५५२), डॉ. अर्पिता तिवारी (५९४), डॉ. पी. पी. पवार (६११) यांनी जागतिक क्रमवारीत स्थान प्राप्त केले आहे.

२०२१-२०२५ या प्रभाव कालावधीसाठी जाहीर झालेल्या या क्रमवारीत ‘एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस’ या संशोधन डॉ सी. डी. लोखंडे यांनी जागतिक स्तरावर २२ वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे, या विषयात भारतातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९९.३८ असून ते जगातील अव्वल ०.२१% संशोधकांमध्ये समाविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. प्रमोद एस. पाटील यांनी याच या विषयात जागतिक क्रमवारीत २४ वे स्थान तर भारतामध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९७.८९ असून ते जगातील सर्वोच्च ०.४७% संशोधकांमध्ये स्थान मिळवून आहेत.

डॉ. उमाकांत एम. पाटील यांनीही याच विषयात त्यांनी ७६ वे जागतिक स्थान पटकावले असून भारतात ८ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९४.२६ आहे. डॉ. विश्वजीत एम. खोत यांनी ‘मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्सचे कॅरेक्टरायझेशन आणि ॲप्लिकेशन्स’ या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत ३२७ वे तर भारतामध्ये ११ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.२३ असून ते जगातील टॉप १.७% संशोधकांत समावेश आहे. डॉ. जयवंत एल. गुंजकर यांनी ‘लेअर्ड डबल हायड्रॉक्साइड्स सिंथेसिस अँड ॲप्लिकेशन्स’ या विषयात ५५२ वे जागतिक स्थान मिळवले असून भारतात २० वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९२.८२ आहे.

डॉ. अर्पिता तिवारी यांनी ‘कार्बन अँड क्वांटम डॉट्स ॲप्लिकेशन्स’ या विषयामध्ये जागतिक स्तरावर ५९४ वे तर भारतात ५५ वे स्थान संपादन केले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.१९ आहे. डॉ. प्रवीण. पी. पवार यांनी ‘रेडिएशन शिल्डिंग मटेरियल्स ॲनालिसिस’ या विषयात ६११ वे जागतिक स्थान मिळवले असून देशात ७५ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८२.९१ आहे.

Amaron

Amaron

जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या या सर्व संशोधकांचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात मिळवलेल्या या यशाबद्दल अतिशय समाधान व्यक्त करत डॉ. पाटील यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आदी उपस्थित होते. एनर्जी मटेरियल्स, सुपरकॅपॅसिटर्स, नॅनोमटेरियल्स, क्वांटम डॉट्स, रेडिएशन शिल्डिंग आणि प्रगत पदार्थ विज्ञान यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळवलेल्या या जागतिक यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचा नावलौकिक उंचावला असून आंतरविद्याशाखीय संशोधनाला मोठी गती मिळाली आहे.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...