कोल्हापूर परिसरातील MSME उद्योगांच्या निर्यात संधींना मिळणार चालना

RAMP अंतर्गत आयोजित ७ वी रिव्हर्स बायर-सेलर मीट यशस्वीरित्या संपन्न

कोल्हापूर:  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या Raising and Accelerating MSME Performance (RAMP) कार्यक्रमासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) ने फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) यांच्या सहकार्याने २९ व ३० सप्टेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेली ७ वी रिव्हर्स बायर-सेलर मीट (RBSM) यशस्वीरित्या पार पाडली.


या RBSM चे प्रमुख उद्दिष्ट MSME उद्योगांची निर्यातसज्जता वाढविणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि MSME क्षेत्राची जागतिक स्पर्धात्मकता अधिक बळकट करणे हे होते. या कार्यक्रमात २७ देशांतील ५२ आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बेलारूस, भूतान, कॅमेरून, कॅनडा, जिबूती, इथिओपिया, घाना, ग्वाटेमाला, गिनी-बिसाऊ, इंडोनेशिया, जपान, केनिया, कुवेत, किर्गिझस्तान, नेदरलँड्स, ओमान, रवांडा, सिंगापूर, श्रीलंका, ताजिकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, युगांडा, अमेरिका आणि झांबिया या देशांचा समावेश होता. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील MSME उद्योगांना निर्यात बाजारपेठांचा शोध घेण्यासाठी तसेच दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक भागीदारी निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील ३८० हून अधिक MSME उद्योगांनी सहभाग घेतला. अर्थपूर्ण आणि परिणामकारक संवाद वाढविण्याच्या उद्देशाने ७५० हून अधिक संरचित B2B बैठका आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक MSME उद्योगाला अनेक परदेशी खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचा समारोप अत्यंत सकारात्मक वातावरणात झाला. सहभागी MSME उद्योग आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांच्यामध्ये ४० हून अधिक सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या करारांमधून आगामी काळात महत्त्वपूर्ण व्यावसायिक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रशांत नारनवरे, भा.प्र.से., सचिव, राज्यपाल कार्यालय; सौ. प्रेरणा देशभ्रतार, भा.प्र.से., आयुक्त, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तथा व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC; डॉ. अजय सहाई, महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, FIEO; तसेच श्री. खुशवंत जैन, प्रादेशिक अध्यक्ष (पश्चिम विभाग), FIEO उपस्थित होते.

MSME उद्योगांना सर्वसमावेशक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमात DGFT, FEDAI, बँक, ECGC आणि इंडिया पोस्ट यांच्या प्रतिनिधींचे विशेष सुविधा कक्ष उभारण्यात आले होते. यासोबतच विविध ज्ञानवर्धक सत्रांचेही आयोजन करण्यात आले. तसेच चामडे, वस्त्रे, परिधान आणि वाद्यनिर्मिती क्षेत्रातील उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनातून परिसरातील औद्योगिक क्षमता आणि स्थानिक उत्पादनांची समृद्धी अधोरेखित झाली. दरम्यान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रमुख उद्योगांना भेट दिली. या भेटीद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगांची उत्पादन क्षमता, गुणवत्ता मानके आणि उत्पादनातील उत्कृष्टतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ७ वी रिव्हर्स बायर-सेलर मीट यशस्वीरित्या पूर्ण होणे हे RAMP उपक्रमांतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. यामुळे महाराष्ट्राची आघाडीचे उत्पादन व अभियांत्रिकी केंद्र म्हणून असलेली ओळख अधिक बळकट झाली आहे. या व्यासपीठामुळे केवळ व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, तर तंत्रज्ञान देवाणघेवाण, क्षमता विकास आणि निर्याताभिमुख वाढ यांनाही चालना मिळाली आहे.

या यशस्वी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुढील रिव्हर्स बायर-सेलर मीट (RBSM) हे १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२६ रोजी इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (EEPC) इंडिया यांच्या सहकार्याने पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील MSME उद्योगांसाठी जागतिक बाजारपेठांतील नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

कोल्हापुरात रॅपिडो अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

रॅपिडो अ‍ॅपचा वापर टाळण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रॅपिडो (Rapido) अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर...

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

वर्षभरात रेमंडच्या शेअरमध्ये १५० टक्क्यांची तेजी; १,२३५ रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई : भारतीय शेअर बाजारात रेमंड लिमिटेडच्या शेअरने २०२६ मध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुमारे ४२५ रुपयांवर असलेला हा शेअर आता १,०५० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे १५० टक्क्यांची वाढ झाली आहे....

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कच्ची साखर आयातीला केंद्र सरकारची ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती; १० लाख टन आयातीला अपेक्षित प्रतिसाद नाही, हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची टंचाई निर्माण होऊन दरात मोठी वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्याच्या मुदतीत ३१...

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

भारतात हॉटेल क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आवश्यक; 2035 पर्यंत 2.1 लाख अतिरिक्त रुम्सची गरज : रिपोर्ट

नवी दिल्ली : भारतात 2035 पर्यंत अंदाजे 1.9 लाख ते 2.1 लाख अतिरिक्त हॉटेल खोल्यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित सुमारे 120 ते 125 दशलक्ष चौरस फूट नवीन रिअल इस्टेट विकसित करावी लागेल. देशांतर्गत पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि प्रीमियम...

दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

दिवाळीचा फराळ देश-विदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये 24 तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध

सात देशांत फराळ व भेटवस्तू पाठविण्याची सुविधा; भारतीय डाक विभागाचे आवाहन कोल्हापूर : दिवाळीनिमित्त घरगुती फराळ, मिठाई, भेटवस्तू आणि स्नेहाच्या शुभेच्छा देशाच्या विविध भागांसह परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांना टपाल सेवांचा...

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

आयडीबीआय बँकेची ५३ हजार कोटींना विक्री; कॅनडाच्या फेअरफॅक्सकडे जाणार ६०.७२%

केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा विक्रीला मंजुरी; भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेतील केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) एकूण ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडास्थित फेअरफॅक्स...