ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन

डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद; मिड स्वीडन विद्यापीठासोबत संयुक्त उपक्रम

कोल्हापूर :  जागतिक स्तरावर संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि मिड स्वीडन युनिव्हर्सिटी, स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘बायलॅटरल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन फंक्शनल मटेरियल्स फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज’ ही आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. ‘फंक्शनल मटेरियल्स टू अ सस्टेनेबल फ्युचर’ या संकल्पनेवर या परिषदेमध्ये प्रगत कार्यात्मक पदार्थ, जैवसाहित्य व ऊती अभियांत्रिकी, ऊर्जा साठवण व रूपांतरण, पर्यावरणपूरक उपाययोजना, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक पदार्थ अशा महत्त्वपूर्ण संशोधन क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली.

मिड स्वीडन युनिव्हर्सिटीचे इनोव्हेशन अँड बिझनेस को-ऑपरेशनचे उपकुलगुरू प्रा. हान्स-एरिक निल्सन आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी दोन्ही विद्यापीठांतील १२ संशोधक व प्राध्यापकांनी आपापल्या संस्थांमधील संशोधन कार्याची माहिती सादर केली. परिषदेच्या पहिल्या सत्रात ऊर्जा साठवण आणि ऊर्जा रूपांतरण उपकरणांसाठी आवश्यक प्रगत पदार्थांवर चर्चा झाली. यामध्ये प्रा. उमाकांत पाटील यांनी ऊर्जा साठवण व रूपांतरणासाठी बाइंडर-फ्री थिन फिल्म इलेक्ट्रोड्स या विषयावर, तर प्रा. जोनास ऑर्टेग्रेन यांनी बॅटरीसाठी नॅनोमटेरियल्स या विषयावर संशोधन सादर केले. डॉ. विजय कुंभार यांनी ऊर्जा साठवण अनुप्रयोगांसाठी मेटल ऑक्साइड हेटरोस्ट्रक्चर्स, प्रा. रेयुन झांग यांनी स्मार्ट सेन्सिंग व ऊर्जा संकलनासाठी सॉलिड-स्टेट उपकरणे, तर डॉ. प्रवीण पवार यांनी फोटॉनिक्स आणि जैववैद्यकीय अनुप्रयोगांसाठी फंक्शनल ग्लासेस या विषयांवर व्याख्याने दिली.

दुसऱ्या सत्रात जैवसाहित्याच्या आधुनिक उपयोगांवर विशेष भर देण्यात आला. प्रा. मॅग्नस नॉरग्रेन यांनी सेल्युलोजचे विविध उपयोग, असोसिएट प्रोफेसर क्रिस्टीना डाहलस्ट्रॉम यांनी सेल्युलोज-आधारित ट्रायबोइलेक्ट्रिक मटेरियल्स, तर डॉ. शिवाजी काष्टे यांनी टिश्यू इंजिनिअरिंगसाठी जैवसाहित्य या विषयावर संशोधन मांडले. प्रा. मनीषा फडतरे यांनी पुढील पिढीतील तंत्रज्ञानासाठी शाश्वत पदार्थ, तर प्रा. अर्पिता तिवारी यांनी बायोसेन्सिंगसाठी बायोफंक्शनलाइज्ड मटेरियल्स या विषयांवर सादरीकरण केले.

या परिषदेचे संयोजक म्हणून प्रा. उमाकांत पाटील आणि प्रा. मनीषा फडतरे यांनी काम पाहिले. परिषदेमध्ये दोन्ही विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. परिषदेचा समारोप डॉ. प्रा. प्रमोद एस. पाटील आणि असोसिएट प्रोफेसर जोनास ऑर्टेग्रेन यांच्या समारोपपर मनोगताने झाला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

विकसित भारतासाठी तरुणांनी मतदानाचा हक्क बजावावा : खासदार धनंजय महाडिक

विकसित भारतासाठी तरुणांनी मतदानाचा हक्क बजावावा : खासदार धनंजय महाडिक

राजर्षी शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रम कोल्हापूर : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘विकसित भारत युवा संवाद’ मार्गदर्शन...

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...