डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

-आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी

कोल्हापूर : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप २५ अॅम्बेसेडरमध्ये स्थान मिळवले. बंगळुरू येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटी येथे आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थी आणि ४ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.यामध्ये आयोजित ऑल इंडिया स्टुडंट, यंग प्रोफेशनल, वुमन इन इंजिनिअरिंग आणि लाइफ मेंबर्स काँग्रेस (एआयएसवायडब्ल्यूएलसी–२०२६) मध्ये देशभरातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या श्रेयश माने याने द्वितीय क्रमांक, तर आशुतोष इंगळे याने २४ वा क्रमांक मिळवत टॉप २५ मध्ये स्थान पटकावले. विद्यार्थ्यांचा आय ट्रिपल ईच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, नेतृत्वगुण आणि स्टुडंट ब्रँचच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल या कामगिरीतून घेण्यात आली.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटची स्टुडंट ब्रँच तुलनेने नव्याने स्थापन झालेली असून, अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील आय ट्रिपल ईच्या व्यासपीठावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील आणि आय ट्रिपल ई स्टुडंट ब्रँचचे प्रमुख डॉ. ग्रंतेज ओतारी, समन्वयक प्रा. सतीश रणभिसे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. डॉ. शीतल दिंडे, डॉ. निलम जाधव आणि प्रा. अमृत काजवे यांनी मेंटॉर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टुडंट ब्रँचच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...