डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

कसबा बावडा : येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा, लॅन गेमिंग, गेस अँड गिगल, पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल मेकिंग अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. तसेच नृत्य स्पर्धेमध्ये वीस ग्रुपने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. गुप्ता यांनी, अभियांत्रिकी शिक्षणाचं महत्व विशद करत विद्यार्थ्यांनी फक्त डिग्री मिळवण्यापर्यंत न थांबता संशोधनातुन समाज हित साधण्याचे आवाहन केले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. नृत्य स्पर्धेसाठी रविराज मोरे आणि रणजीत दुधाणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच मेकॅनिकल सिविल आणि कॉम्प्युटरविभागातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, विभागप्रमुख डॉ.पी.के. शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. शितल साळोखे आदी उपस्थित होते.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...