जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- सुरुपली असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.72 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.54 टीएमसी, जांबरे 0.30 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.67 टीएमसी, धामणी 3.85 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 27 फूट, सुर्वे 26.6 फूट, रुई 60.3 फूट, इचलकरंजी 58.8 फूट, तेरवाड 53.6 फूट, शिरोळ 47.6 फूट, नृसिंहवाडी 44.6 फूट, राजापूर 34.11 फूट तर नजीकच्या सांगली 12.11 फूट व अंकली 19.8 फूट अशी आहे.

जिल्ह्यात पावसाची उघडीप

जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाने उघडीप दिली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 1.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 0.1 मिमी, शिरोळ -0.0 मिमी, पन्हाळा- 0.6 मिमी, शाहुवाडी- 0.4 मिमी, राधानगरी- 0.1 मिमी, गगनबावडा- 1.3 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- 0.0 मिमी, भुदरगड- 0.2 मिमी, आजरा- 0.0 मिमी, चंदगड- 0.8 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा जिल्हा बँकेतील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध; पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर कोल्हापूर : सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक म्हणून कार्यरत राहण्यासंदर्भातील निर्बंधांवर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी...

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपासून राज्यात मध्यम स्वरूपाच्या...

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू...

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली : जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच गत आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा विहित वेळेत वापर करून प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वी सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत पुणे: संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात...

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणातून सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे...