बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

‘मॅपकॉन-२०२६’ परिषदचे डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवसीय परिषदेत एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्टचा सहभाग

कोल्हापूर :  वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) आधुनिक तंत्रज्ञानाला स्वतःचे ज्ञान आणि अनुभवाची जोड देत कमी वेळेत अचूक निदान करण्यावर पॅथॉलॉजिस्टनी भर द्यावा, असे आवाहन इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी केले.

इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या ४७ व्या वार्षिक ‘मॅपकॉन-२०२६’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. माधव कोल्हटकर आणि डॉ. मीरा झवर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्ट सहभागी झाले आहेत.

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा पॅथॉलॉजी विभाग, असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, कोल्हापूर आणि इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने हॉटेल सयाजी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. कानडे म्हणाले, व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्यामागील अचूक कारण शोधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पॅथॉलॉजिस्ट पार पाडतात.सूक्ष्मदर्शकापासून सुरू झालेला पॅथॉलॉजीचा प्रवास डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत आणि आता एआयपर्यंत पोहोचला आहे. रोगनिदानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा; मात्र अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचताना स्वतःचे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अनुभव यांना पर्याय नाही. या सर्वांची सांगड घालून अचूक निदान करणे आवश्यक आहे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, डिजिटल पॅथॉलॉजीमुळे रोगांचे जलद आणि अचूक निदान होण्यास मदत होईल. एआय पॅथॉलॉजिस्टची जागा घेऊ शकत नाही; मात्र निदान प्रक्रियेत ते निश्चितच उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पॅथॉलॉजिस्टनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून निदानातील अचूकता वाढवावी. संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुचिता देशमुख यांनी ‘नेक्स्ट जनरेशन पॅथॉलॉजी’ या परिषदेच्या संकल्पनेची माहिती दिली. रुग्णाच्या उपचारप्रक्रियेत पॅथॉलॉजिस्टचे योगदान महत्त्वाचे असून, वैज्ञानिक ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे महाराष्ट्र चॅप्टरचे उपाध्यक्ष डॉ. राजीव राव, सचिव डॉ. चंद्रशेखर भाले, डॉ. शैलेश कोरे, डॉ. कैलाश सचदेव, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, परिषदेचे सचिव डॉ. आर. एस. पाटील, खजिनदार डॉ. आर. एम. शिंदे, डॉ. सत्यव्रत सबनीस, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. पुरोहित, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. साळोखे, डॉ. अश्विनी माने, डॉ. प्रतिमा पाटील आदी उपस्थित होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन
परिषदेच्या पहिल्या दिवशी देशभरातील तज्ज्ञांनी पॅथॉलॉजीमधील आधुनिक संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान आणि निदानाच्या बदलत्या पद्धतींवर मार्गदर्शन केले. डॉ. संगीता बी. देसाई यांनी ‘मोमेंटम ऑफ प्रिसिजन पॅथॉलॉजी’, डॉ. जय मेहता यांनी ‘नेक्स्ट जन आयएचसी’, डॉ. अनिता भादुरी यांनी ‘डायग्नॉस्टिक क्लॅरिटी : डिस्टिंग्विशिंग इन्फ्लेमेटरी लिझन्स इन इंटेस्टायनल पॅथॉलॉजी’, तर डॉ. कीर्ती छडा यांनी ‘एआय इन लॅबोरेटरी मेडिसिन, नेक्स्ट जनरेशन पॅथॉलॉजी’ या विषयांवर विचार मांडले. याशिवाय डॉ. अरशद खान पठाण, डॉ. सुजीत जोशी आणि डॉ. पुष्पा सिंह यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पीजी क्विझ, डॉ. रायचूर अवॉर्ड पेपर प्रेझेंटेशन आणि बेस्ट ओरल पेपर प्रेझेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

रविवारी कर्नल डॉ. व्यंकटेशन सोमसुंदरम, डॉ. अनिता महादेवन आणि डॉ. मुक्ता रामदवार यांच्यासह मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. यासोबतच पोडियम पोस्टर प्रेझेंटेशन आणि मॅपकॉन स्लाइड सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयक्युएसी संचालिका डॉ. शिंपा शर्मा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, सीएचआरओ श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह वैद्यकीय व पॅथॉलॉजी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत...

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील...

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक...

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला  जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे...

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:  राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात...

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात

-शुक्रवार २ ऑक्टोबर पासून प्रारंभ -डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज,पॅथॉलॉजी विभागाकडून आयोजन -तीन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर होणार विचार मंथन कोल्हापूर : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’...