कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’ आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे शिल्पकार असतात. प्रगतीच्या पथावर मदत करणाऱ्या या माणसांना मनात कायम स्थान द्यायला हवे. याच कृतज्ञतेच्या भावनेतून साकारलेले डॉ. भोसले यांचे ‘मी एक भाग्यवान’ हे पुस्तक एक उत्तम ‘व्यक्ती चरित्रात्मक आत्मचरित्र’ आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते व माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले लिखित ‘मी एक भाग्यवान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते कसबा बावडा येथील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पाटणे बोलत होते. व्यासपीठावर डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे माजी कुलपती डॉ. बी. पी. साबळे, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भगवान हिर्डेकर, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके, सौ. कुसुम व्ही. भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. पाटणे यांनी जीवनातील संघर्षाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, केवळ गुणांच्या टक्क्यांवरून माणूस मोठा होत नाही, तर जीवनात टक्के-टोणपे खाऊन जी अनुभव संपन्नता येते, तीच खरी गुणवत्ता असते. ज्या संस्थेत गुणवत्तेची अचूक नोंद घेणारे डॉ. संजय डी. पाटील यांच्यासारखे संस्थाचालक असतात, तिथेच असे माणिक-मोती घडतात. नियतीच्या कृपेने माणूस नशीबवान ठरतो, मात्र कष्टाने आलेल्या अडथळ्यांवर मात केल्यावरच खऱ्या अर्थाने भाग्य उजळते. परतत्त्वाचा स्पर्श झाला की माणसाचा उत्कर्ष होतो, त्याप्रमाणे डॉ. भोसले यांच्यातील चांगला लेखक घडला आहे. हे पुस्तक वाचून प्रत्येकाचे हात भाग्यवान व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भगवान हिर्डेकर यांनी डॉ. भोसलेंच्या कार्याचा गौरव केला. सलग दोन दशके कुलसचिव पदावर कार्यरत असलेले डॉ. भोसले हे बहुधा एकमेव व्यक्ती असावेत. आपले आयुष्य घडवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाबाबत लिहिलेच पाहिजे, कारण या पुस्तकातून अनेकांसाठी शिकण्यासारखे खूप काही आहे, असे ते म्हणाले. डॉ. अमर आडके यांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या विचारांचा दाखला देत सांगितले की, माणूस कुठून आला यापेक्षा तो कुठे पोहोचला, हे अधिक महत्त्वाचे असते. समाजात प्रसिद्धीपासून दूर असलेली आणि निष्ठेने काम करणाऱ्या माणसाचा नेहमी सन्मान व्हायला हवा आणि डॉ. भोसले यांच्या पुस्तकातून अशा व्यक्तींचा सन्मान झाला आहे.

आयुष्यात देवदूत भेटले अन् प्रगती झाली : डॉ. भोसले
लेखक डॉ. व्ही. व्ही. भोसले म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. एका गावातून असंख्य अडचणी पार करत घेतलेली पदवी आणि शिवाजी विद्यापीठातील सांख्यिकी सहाय्यक ते डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठातील सलग २१ वर्षे कुलसचिव हा माझा प्रवास डॉ. साबळे सर आणि आयुष्यात भेटलेल्या देवदूतांसारख्या माणसांमुळेच शक्य झाला. त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून डॉ. पाटणे यांच्या सूचनेनुसार आणि डॉ. हिर्डेकर यांच्या मदतीने मी हे पुस्तक शब्दबद्ध केले.

Amaron

Amaron

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कामाक्षी भोसले-शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिल खटावकर यांनी मानले. यावेळी डॉ. भोसले यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या सोहळ्याला डॉ. भालबा विभुते, डॉ. व्ही. एस. मुढे यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, कृष्णा महाविद्यालय रेठरे येथील माजी विद्यार्थी, डॉ. भोसले यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

-आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी कोल्हापूर : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप...