डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘रेलमार्ग’ प्रणालीचा यावेळी गौरव करण्यात आला. के. एस. स्कुल ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट, बंगळुरू येथे झालेल्या ‘अन्वेषण 2026’ या स्पर्धेत देशभरातील 100 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी 24 तासांमध्ये तयार केलेली ‘रेलमार्ग’ नावाची रेल्वेच्या आदान- प्रदान संबंधित प्रणाली विशेष लक्षवेधी ठरली. या संघाला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या श्रेया काळेबेरे, शुभम पट्टेवार, अनुज पोवार व प्रीती सोनुले या चार विद्यार्थ्यांसमवेत प्रोजेक्ट गाइड प्रा.सौ. सोनाली शिंगे यांचा समावेश आहे. या संघाला सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के . गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी संघातील विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

-आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी कोल्हापूर : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप...