गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचे षड्यंत्र; आमदार सतेज पाटील यांचा महायुतीवर आरोप

९ नोव्हेंबरला कोल्हापुरात ‘कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा’ काढणार

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी दिलेला कौल डावलून संघावर ताबा मिळवण्यासाठी राज्य सरकारने पाच शासकीय सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकशाही आणि सहकार क्षेत्राला घातक असून, शेतकऱ्यांच्या मालकीचा गोकुळ संघ अमूलच्या घशात घालण्याचे हे षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला. येत्या ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकातून ‘कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी नियमांमध्ये बदल करून पाच शासकीय सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. चार सदस्यांची नियुक्ती करून संचालकांची संख्या १२ वरून १६ करण्याचा आणि बहुमत मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले. उद्या गोकुळवर अमूलचे लेबल लावून ही संस्था त्यांच्या ताब्यात दिली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने सहकार कायद्यात केलेली सुधारणा केवळ गोकुळपुरती मर्यादित राहणार नाही. साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना या तरतुदीतून वगळण्यात आले असले, तरी भविष्यात अन्य सहकारी संस्थांवरही अशा प्रकारे सरकारी सदस्य नियुक्त करून ताबा मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मुंबईतील एसआरए प्रकल्पांशी संबंधित गृहनिर्माण संस्थांमध्येही अशा नियुक्त्या करून संस्थांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कायद्यात बदल करून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांचा कट… 

गोकुळ दूध संघावर साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित अवलंबून आहे. दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांना सुमारे १०० कोटी रुपयांचे दूध बिल अदा केले जाते. अशा महत्त्वपूर्ण संस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी संगनमताने हा डाव आखल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

‘शेतकरी मतचोरी विसरत नाहीत’; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरून भाजपवर टीका केली. गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपला नाकारल्यानंतर निवडणुकीचे नियम बदलून संचालकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चार सदस्यांची नियुक्ती करून बहुमत मिळवणे म्हणजे दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आणि जनादेशात केलेली भेसळ आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात आहे. मात्र, मतांची चोरी करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, शेतकरी कधीही विसरत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.

गोकुळमधील डेडलॉक संपवण्यासाठीच शासकीय संचालकांची नियुक्ती; मुलगा तज्ज्ञ संचालक होणार नसल्याचे स्पष्टीकरण

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीदरम्यान फेक अकाउंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरप्रचार करण्यात आला. या माध्यमातून राज्यभर वातावरण निर्माण करण्यात काही जण यशस्वी झाले. गैरप्रचार करण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील तरबेज आहेत. मात्र, आम्ही भोळीभाबडी माणसे आहोत, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. गोकुळ दूध संघ हा अमूल दूध संघाएवढा मोठा नसला, तरी नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून मोठ्या प्रमाणात गैरप्रचार करण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली, असे मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif

Hasan Mushrif

 

गोकुळ दूध संघातील कोरमच्या पोटनियमामुळे निर्माण झालेला प्रशासकीय पेच सोडवण्यासाठीच राज्य सरकारने शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आठवडाभरापूर्वी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित राहिल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी १० तारखेला होणाऱ्या अध्यक्ष निवडीच्या सभेतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. हा पेच दूर करून गोकुळचा कारभार सुरळीत चालवायचा असेल आणि लोकशाही कायम ठेवायची असेल, तर सर्व २५ संचालकांच्या सहभागातून निर्णयप्रक्रिया होणे आवश्यक आहे. हा डेडलॉक दूर करण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागला, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

माझा मुलगा तज्ज्ञ संचालक होणार नाही

गोकुळमध्ये कोणाचीही मागील दाराने नियुक्ती केली जाणार नाही. शासनाकडून केवळ संबंधित क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींचीच संचालक म्हणून नियुक्ती केली जाईल. माझा मुलगा किंवा अन्य कोणतीही राजकीय व्यक्ती तज्ज्ञ संचालक होणार नाही. राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसलेल्या पात्र आणि तज्ज्ञ व्यक्तींचीच निवड केली जाईल, असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

फटाक्यांच्या ध्वनी मापनाची सायबर कॉलेज ग्राऊंडवर चाचणी

फटाक्यांच्या ध्वनी मापनाची सायबर कॉलेज ग्राऊंडवर चाचणी

कोल्हापूर : दिवाळी सणापूर्वी स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या ध्वनी मापनाची चाचणी सायबर कॉलेज ग्राऊंड येथे घेण्यात आली. सुट्टे फटाके, फटाक्यांच्या माळा यांसह विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता यावेळी मोजण्यात आली. विहित मर्यादेत असणाऱ्या...

हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकर माफ करणार नाहीत : आमदार सतेज पाटील

हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकर माफ करणार नाहीत : आमदार सतेज पाटील

गोकुळच्या अध्यक्षपदावरून चुयेकरांच्या वारसाला रोखण्याचा महायुतीचा डाव; निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देणार कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे. गोकुळचे शिल्पकार आनंदराव...

गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील

गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील

सांगली : गोकुळ दूध संघ आणि सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या कथित फसवणुकीविरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या सर्व संकटांवर निश्चितपणे मात करू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त...

स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील 

स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील 

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं योग्य नसेल. स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालल्या पाहिजेत, या संस्था मोडून...

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...