पावसाच्या कमी प्रमाणामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना शासनाचा आधार; नुकसानभरपाई थेट खात्यावर जमा 

कोल्हापूर : यावर्षी पावसाने कधी अतिवृष्टी तर कधी प्रदीर्घ खंड असे लहरी रूप दाखवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला. मात्र, वेळेत पंचनामे होऊन शासनाची तातडीची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने भात, नाचणी, भुईमूग यांची लागवड केली. मात्र, ऐन पीक जोमात असताना सप्टेंबर महिन्यात पावसाने खंड दिला. ज्या ठिकाणी भात बाहेर पडण्याची वेळ होती, तिथे पाणीच मिळाले नाही. तर काही ठिकाणी सततच्या पावसाने पिकांची वाढच खुंटली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.

या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महसूल व कृषी विभागाने तातडीने पावले उचलली. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी गावागावांत जाऊन प्रत्यक्ष शेतात पीक पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून फॉर्म वेळेवर भरून घेतले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपयांची तातडीची मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. ही प्रक्रिया जलद झाल्याने शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील शेतकरी रामचंद्र गणपती ढेरे यांच्या शेतातील नाचणी व भात पिकांची पावसाअभावी वाढच झाली नाही. पीक पूर्ण वाळून गेले. पाहणीनंतर मदत खात्यावर जमा झाली. “संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून आहे. बाहेर मजुरीचेही उत्पन्न नाही. अशा वेळी खात्यावर पैसे जमा झाले म्हणून आम्ही आभारी आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Amaron

Amaron

कौलव येथील शेतकरी दत्तात्रय चरापले यांच्या डोंगर भागातील भात पिकाचेही मोठे नुकसान झाले. “ऐन पावसाळ्यामध्ये पाऊस भरपूर झाला, तरीसुद्धा ज्यावेळी भात बाहेर पडायला आले, त्यावेळी सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे भाताचे पीक पूर्ण गेले,” असे त्यांनी सांगितले. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी पंचनामे करून फॉर्म वेळेवर भरल्याने त्यांना ५,००० रुपयांची मदत मिळाली. “ही मदत समाधानकारक आहे. शासनाचा मी पूर्ण आभारी आहे,” असे ते म्हणाले.

पन्हाळा तालुक्यातील घोटवडे येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण लवटे यांनी यावर्षी नाचणी व भाताचे पीक घेतले होते. पाऊस कमी पडल्याने पिकांची वाढ खुंटली आणि अतोनात नुकसान झाले. पंचनाम्यानंतर त्यांना ५,००० रुपयांची तातडीची मदत मिळाली. “या मदतीमुळे आमच्या कुटुंबाला हातभार लागला,” असे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले. कौलव येथीलच शेतकरी सुभाष भिवा पाटील यांच्या डोंगर भागातील भात पिकाचे पावसाने नुकसान झाले. “आमचे अवलंबित्व या शेतीवरच आहे. दिवाळीच्या सणासुदीत भाताचे नुकसान झाले असताना सणाच्या तोंडावर पंचनामा करून ही मदत मिळाली, याचे समाधान वाटले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी

ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी

२५० कुटुंबांना साडी, लहान मुलांना कपडे, फराळ आणि मिठाईचे झाले वाटप कोल्हापूर : हातावरचे पोट असलेली अनेक कुटुंबं, अडीचशे ते तीनशे मैलावरुन ऊस तोडीसाठी साखर कारखाना स्थळावर येतात. त्यांना सण-उत्सवाचा आनंद घेता येत नाही. एकवेळची चूल पेटणेही अवघड असते. अशा ऊस तोडणी...

दुष्काळी परिस्थितीत पाणी बचतीसाठी खोडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ करा

दुष्काळी परिस्थितीत पाणी बचतीसाठी खोडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ करा

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून काही भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे...

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...