नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय

मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडून या पाण्याची मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावर तात्काळ निर्देश दिले.

नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय पुनर्विचार समितीची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या नर्मदा प्रकल्प दायित्वाच्या अनुषंगाने कार्यवाहीची माहिती दिली.

नर्मदा जलविवाद निवाड्यात महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मंजूर आहे. त्यापैकी पाच टीएमसी पाणी वळण कालव्याद्वारे मिळणार असून, उर्वरित पाच टीएमसी पाणी उकाई धरणातून देण्याचे ठरले होते. त्यानुसार मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नियमनानुसार पाणी महाराष्ट्राला देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उकाई धरणातून महाराष्ट्राला पाणी मिळणे अपेक्षित आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार महाराष्ट्राला त्याच्या वाट्याचे पाणी उपलब्ध व्हावे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ऊस पिकातील प्रात्यक्षिके आणि सुपरकेन नर्सरी या घटकांसाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात...