साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य दर देण्याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

गाळप हंगाम 2026 – 27 च्या गळीत हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाळप हंगाम 2026 – 27 सुरु करणे व ऊस दर देणे, भरारी पथकाकडून ऊस वजनकाटा तपासणी करणे, ऊस वाहतूक संघटनांची निवेदने व आयत्या वेळच्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीला आमदार सर्वश्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सह संचालक (साखर) उज्वला पळसकर, सहकार व साखर आयुक्तालयाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, वजन मापे विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित मान्यवरांनी गळीत हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच ऊस दराबाबत चर्चा केली. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ऊस उत्पादकांना गळीत हंगामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. उसाच्या दराबाबत प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल यानंतर लवकरच ऊस दराबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल.

Amaron

Amaron

राजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा दर आणि साखर कारखानदारांकडून देण्यात येणाऱ्या दरामध्ये तफावत आहे. या दोहोंमध्ये समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कारखानदार, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधींसोबत चर्चा करुन योग्य तो तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके यांनीही साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ऊस दराबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आवाहन केले. बैठकीच्या सुरुवातीला विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गळीत हंगामात येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच ऊसाला योग्य दर मिळण्याचे आवाहन केले. साखर कारखानदारांना सहकार्य केले जाईल, तथापि साखरेच्या दराचा विचार करुन त्यानुसार ऊसाला योग्य दर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

शेतकरी बांधवानो, ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके व सुपरकेन नर्सरीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज  करा

कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ऊस पिकातील प्रात्यक्षिके आणि सुपरकेन नर्सरी या घटकांसाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात...