राज्यातील सर्व शाळा ९ जुलै रोजी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. तसेच आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले असून ९ जुलै रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांचे अध्यापन नियमित सुरू ठेवावे, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा जिल्हा बँकेतील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध; पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर कोल्हापूर : सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक म्हणून कार्यरत राहण्यासंदर्भातील निर्बंधांवर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी...

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपासून राज्यात मध्यम स्वरूपाच्या...

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू...

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली : जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच गत आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा विहित वेळेत वापर करून प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वी सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत पुणे: संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात...

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणातून सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे...