एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणातून सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे एसटीच्या जमीनीवरील विकास प्रकल्पाना गती मिळेल. महामंडळाच्या राज्यात सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागा आहे. यातील बऱ्याचशा जागा मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्या सार्वजनिक खासगी सहभागाअंतर्गत विकसित करून महामंडळास नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यातील काही जागांचा वापर बस स्थानक सुविधांसह अनुषंगिक वाणिज्य स्वरूपाचा तर काही जागा पूर्णतः रहिवाशी स्वरूपाच्या आहेत. अशा जागा विकसित करीत असताना बहुतांश वाणिज्य जागांवर व्यापारी संकुलासोबत रहिवाशी, अन्य उपयोगाची मान्यता मिळाल्यास व्यावसायिक उपयोगितेचा पूर्णतः वापर करून महामंडळास फायदा मिळणे शक्य आहे.

राज्य शासनाने १ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयान्वये महामंडळाच्या जागा व्यापारी तत्त्वावर विकसीत करण्यास मंजुरी दिली आहे.या निर्णयानुसार आणि आठ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयान्वये उत्पन्नवाढीसाठी जागा विविध व्यावसायिक प्रयोजनासाठी ४९ + ४९ वर्षांच्या भाडे तत्वावर विकसित करण्यास मान्यता दिली आहे. महामंडळाच्या जागा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर विकसित करताना निवासी, अनिवासी, व्यापारी, औद्योगिक इत्यादी सर्व बाबींसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जागांचा विकास करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्य़ात आली आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, व्यवहार्य सल्लागार, वास्तुविशारद सल्लागार, विधि सल्लागार यांची नियुक्ती केली आहे.मात्र राज्य शासनाने पाच मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण घोषित केले आहे. मात्र या धोरणानुसार कार्यवाही करावयाची झाल्यास एसटी महामंडळाच्या प्रकल्पांना विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धोरणातून सवलत देण्यास आज मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने राज्यातील एकूण २१३ ठिकाणांच्या विकासाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या सर्व जागांच्या विकासासाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती, शक्ती प्रदत्त समितीची मान्यता घेण्यातून सवलत देण्यात आली आहे. मात्र प्रकल्पास शासन स्तरावरून अंतिम मान्यता घेणे बंधनकारक असणार आहे. प्रकल्पांसाठी निविदा कार्यवाही, सवलत करारानामा साक्षांकन, मालमत्ता हस्तांतरण आणि प्रकल्प अंमलबजावणी आणि इतर महत्वांच्या बाबींसाठी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या निर्देशानुसार महामंडळाच्या संचालक मंडळाने पुढीस कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा जिल्हा बँकेतील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध; पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर कोल्हापूर : सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक म्हणून कार्यरत राहण्यासंदर्भातील निर्बंधांवर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी...

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपासून राज्यात मध्यम स्वरूपाच्या...

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू...

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली : जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच गत आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा विहित वेळेत वापर करून प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वी सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत पुणे: संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात...

FDA विभागाच्या धडक कारवाया अधिक कठोरपणे सुरू राहणार; नियमांशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही : तुकाराम मुंढे

FDA विभागाच्या धडक कारवाया अधिक कठोरपणे सुरू राहणार; नियमांशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही : तुकाराम मुंढे

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाया यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असून, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्न व औषध...