डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला ‘प्रोजेक्ट नेफ्रोकेअर’ अंतर्गत सुमारे ६३ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय नेफ्रोकेअर उपकरणे हस्तांतरित करण्यात आली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थितीत रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते ही उपकरणे हस्तांतरित करण्यात आली.

Amaron

Amaron

रोटरी फाउंडेशन ग्लोबल ग्रँट अंतर्गत देण्यात आलेल्या या उपकरणांमध्ये सीआरआरटी मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरिंज पंप, इन्फ्युजन पंप आणि डायलिसिस बेड यांचा समावेश आहे. गंभीर अवस्थेतील मूत्रपिंड विकारांच्या गरजू रुग्णांवर उपचार करताना या उपकरणांचा मोठा फायदा होणार असून, नेफ्रोलॉजी विभागातील रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे.

Ujwal new

यावेळी बोलताना डॉ. लेनी दा कोस्टा म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहचवण्याचे काम डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे. नेफ्रोकेअर उपकरणामुळे मूत्रपिंड विकाराशी सबंधित रुग्णांना उत्तम उपचार मिळण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणालाही मोठी मदत होईल. ग्रामीण भागात डायलिसिस अन्य उपचार सुविधांची कमतरता असून केवळ अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून न थांबता, त्यांचा प्रभावी वापर करणारे कुशल तंत्रज्ञ घडविण्यावरही भर दिला पाहिजे.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष रो. योगेश रास्ते म्हणाले, समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे रोटरीचे ध्येय आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. रोटरी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या एकत्रित प्रयत्नांतून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.

हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सुषमा जोतकर म्हणाल्या, रोटरीच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक उपकरणांमुळे गंभीर रुग्णाना दिलासा मिळेल. एकाच वेळी अनेक अवयवांच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही उपकरणे विशेष उपयुक्त ठरणार आहेत.रोटरीयन राहुल कुलकर्णी म्हणाले, रोटरी आणि डी. वाय. पाटील संस्थेचे अनेक वर्षांपासून सहकार्याचे संबंध आहेत. यापूर्वी शिशु रक्षा, स्पाइन केअर, तसेच रक्ताच्या आजारांवरील उपचारांसाठी सहाय्य करण्यात आले. या सुविधांचा डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने वापर होत असून, यापुढेही रुग्णांच्या हितासाठी हे सहकार्य कायम राहील.

कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी रोटरीच्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. रोटरीने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधांचा समाजातील गरजू रुग्णांना जास्तीत जास्त फायदा मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.रोटेरियन अरुण भंडारे यांनी रोटरीच्या माध्यमातून आरोग्यसेवा अधिक भक्कम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अत्याधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना उत्तम सुविधा उपलब्ध होऊन आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. जे. ख्यालप्पा, उप-अधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, रोटेरियन अरुण भंडारे, रो. विजय कुलकर्णी, रो. चेतन एस. भोकरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार डॉ. अभिजित कोराणे यांनी मानले.

सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे

सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे

कोल्हापूर  : दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी केले. कोल्हापूर शहरातील प्रमुख मानाच्या मंगळवार पेठेतील श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’...

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर :  जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यभरात 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या...

बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमधील एंडोक्राइनोलॉजीवर परिषद संपन्न कोल्हापूर :  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा, मधुमेह, वाढीमधील समस्या तसेच हाडांशी संबंधित आजार आणि विविध अंतःस्रावी विकारांच्या (एंडोक्राइनोलॉजी) आधुनिक निदान...

कोल्हापूरला होणार 500 खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूरला होणार 500 खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

४,२५० कोटींच्या प्रगती प्रकल्पाला मंजुरी; पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित बळकटी देणाऱ्या-प्रगती प्रकल्पास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता कोल्हापूर : महाराष्ट्रातील सार्वजनिक...

टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप ‘बीआयआरएसी’कडून ५८.५१६ लाखांचे संशोधन अनुदान

टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप ‘बीआयआरएसी’कडून ५८.५१६ लाखांचे संशोधन अनुदान

डॉ. दीपक सावंत यांचे ‘पेपर बेस्ड निदान’ प्रणालीवर संशोधन कोल्हापूर : क्षयरोग (टीबी) आणि त्यामुळे होणाऱ्या मेंदूज्वराचे जलद, अचूक आणि किफायतशीर निदान करण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने महत्त्वपूर्ण संशोधन हाती घेतले आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे...

जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर

जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने 15 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी 61...