दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान
-कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड झाली आहे. यामुळे कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधन कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. डॉ. गुंजकर यांना यापूर्वी भारत सरकारची प्रतिष्ठित रामानुजन फेलोशिपही प्राप्त झाली आहे.

डॉ. गुंजकर हे दक्षिण कोरियातील चुंग-अंग विद्यापीठाच्या फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील फूड बायोसेन्सर अँड थेरानोसिस प्रयोगशाळेत प्रा. जोंग पिल पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणार आहेत. ब्रेन पूल फेलोशिपमुळे अनुभवी संशोधकांना प्रगत संशोधन सुविधा, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि जागतिक संशोधन सहकार्याच्या संधी उपलब्ध होतात. यामुळे डॉ. गुंजकर यांना आंतरराष्ट्रीय अनुभव संपादन करून भारतीय संशोधन क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे.

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च मधील डॉ. गुंजकर यांच्या संशोधनकार्याचा या निवडीत महत्त्वपूर्ण वाटा आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन, संशोधन प्रकल्पांची उभारणी आणि प्रगत संशोधन सुविधांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्या संशोधन प्रवासाला भक्कम आधार मिळाला. चुंग-अंग विद्यापीठासोबत संयुक्त संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रांचे प्रकाशन, शास्त्रज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त मार्गदर्शन, पेटंट आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याची संधी या फेलोशिपमुळे उपलब्ध होऊ शकते. डॉ. गुंजकर यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचा व विद्यापीठाचाही गौरव वाढला आहे.

या फेलोशिपमुळे मिळणारा आंतरराष्ट्रीय संशोधनाचा अनुभव कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील विकासासाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न राहील. या फेलोशिपमुळे संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्रकाशने आणि विद्यार्थ्यांसाठी नव्या संशोधनसंधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी भावना डॉ. गुंजकर यांनी व्यक्त केली.या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील यांनी डॉ. गुंजकर यांचे अभिनंदन केले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे पाठबळ
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे संशोधन कार्यासाठी नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ लाभल्याचे डॉ. गुंजकर यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाचे नेतृत्व, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

-आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी कोल्हापूर : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप...