ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:  राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या औषध साठ्याची गुणवत्ता ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. या तपासणीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार असून पथकांद्वारे राज्यातील आठही परिमंडळातील संस्थेमध्ये तपासणी केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता यात तपासली जाणार आहे.

यासाठी आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तज्ज्ञ औषधनिर्मात्यांची (फार्मासिस्ट) स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार आहे. या टीमला ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषधांची तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. बैठकीत याचे सादरीकरण करण्यात आले. पुरवठा धारकांकडून पुरवठा करण्यात आलेल्या औषधांची दर्जाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीला राज्य वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बापू  पवार, आरोग्य संचालक (मुंबई ) डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक (पुणे )डॉ. विजय कंदेवाड, सह संचालक सुनिता गोल्हाईत उपस्थित होते.

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत...

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील...

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक...

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला  जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे...

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

‘मॅपकॉन-२०२६’ परिषदचे डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवसीय परिषदेत एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्टचा सहभाग कोल्हापूर :  वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची...

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन कोल्हापुरात

-शुक्रवार २ ऑक्टोबर पासून प्रारंभ -डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज,पॅथॉलॉजी विभागाकडून आयोजन -तीन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर होणार विचार मंथन कोल्हापूर : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’...