बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमधील एंडोक्राइनोलॉजीवर परिषद संपन्न

कोल्हापूर :  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा, मधुमेह, वाढीमधील समस्या तसेच हाडांशी संबंधित आजार आणि विविध अंतःस्रावी विकारांच्या (एंडोक्राइनोलॉजी) आधुनिक निदान व उपचारपद्धतींबाबत मार्गदर्शन करणारी वैद्यकीय परिषद व कार्यशाळा संपन्न झाली. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागातर्फे कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटना आणि अखिल भारतीय एंडोक्राइन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बाल व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध अंतःस्रावी ग्रंथींचे आजार, त्यांचे निदान, उपचार आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थापन यावर परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉ. वामन खाडिलकर, डॉ. अनुराधा खाडिलकर आणि डॉ. गणेश जवळेकर यांनी बालक व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध अंतःस्रावी विकारांवर मार्गदर्शन केले. वाढत्या लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, बालमधुमेह, मुलांची उंची व वाढीशी संबंधित विकार, तसेच हाडांचे आजार याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. या आजारांच्या प्रतिबंधासोबतच उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय व्यवस्थापनातील नव्या दृष्टिकोनांवरही चर्चा झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे ८० बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. यावेळी कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी डॉ. विजय गावडे, डॉ. मिलिंद सदावर्ते आणि डॉ. रुचिका यादव , एंडोक्राइन विषयातील तज्ज्ञ डॉ. अनिकेत कुंभोजकर आणि डॉ. इशिता भौमिक यांची विशेष उपस्थिती होती.

संयोजन समिती प्रमुख आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी विभागातील डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. निगडे आणि डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत...

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील...

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक...

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला  जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे...

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

‘मॅपकॉन-२०२६’ परिषदचे डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवसीय परिषदेत एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्टचा सहभाग कोल्हापूर :  वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची...

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:  राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात...