सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे

कोल्हापूर  : दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी केले. कोल्हापूर शहरातील प्रमुख मानाच्या मंगळवार पेठेतील श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे.

माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. यावेळी उपस्थित श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक व उपस्थित भाविकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार सुविधांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर :  जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यभरात 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या...

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला ‘प्रोजेक्ट नेफ्रोकेअर’ अंतर्गत सुमारे ६३ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय नेफ्रोकेअर उपकरणे हस्तांतरित करण्यात आली. डी. वाय. पाटील...

बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमधील एंडोक्राइनोलॉजीवर परिषद संपन्न कोल्हापूर :  डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा, मधुमेह, वाढीमधील समस्या तसेच हाडांशी संबंधित आजार आणि विविध अंतःस्रावी विकारांच्या (एंडोक्राइनोलॉजी) आधुनिक निदान...

कोल्हापूरला होणार 500 खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूरला होणार 500 खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

४,२५० कोटींच्या प्रगती प्रकल्पाला मंजुरी; पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित बळकटी देणाऱ्या-प्रगती प्रकल्पास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता कोल्हापूर : महाराष्ट्रातील सार्वजनिक...

टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप ‘बीआयआरएसी’कडून ५८.५१६ लाखांचे संशोधन अनुदान

टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप ‘बीआयआरएसी’कडून ५८.५१६ लाखांचे संशोधन अनुदान

डॉ. दीपक सावंत यांचे ‘पेपर बेस्ड निदान’ प्रणालीवर संशोधन कोल्हापूर : क्षयरोग (टीबी) आणि त्यामुळे होणाऱ्या मेंदूज्वराचे जलद, अचूक आणि किफायतशीर निदान करण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने महत्त्वपूर्ण संशोधन हाती घेतले आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे...

जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर

जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने 15 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी 61...