वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या पंपिंग स्टेशनसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात राज ठाकरे यांनी कर्जत येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या ऊर्जा धोरणावर तसेच राज्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांनी आरोप केला की, राज्यात सध्या आणले जात असलेले विविध प्रकल्प हे मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून नेमके कोणाचे हित साधले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आणखी १३ हजार मेगावॅट विजेची गरज कशासाठी?

सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सध्याची गरज भागवण्यासाठी राज्यात आवश्यक तेवढी वीजनिर्मिती होत असताना आणखी १३ हजार मेगावॅट विजेची गरज का निर्माण झाली आहे, याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे. वाढत्या लोकसंख्येला आणि उद्योगांना अधिक वीज लागेल, हे मान्य आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करणे आवश्यक आहे का, याचा विचार झाला पाहिजे.

डेटा सेंटर्ससाठी एवढा अट्टाहास का?

महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या डेटा सेंटर्सच्या वाढत्या संख्येवरही राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात आणि अखंडित वीजपुरवठा आवश्यक असतो. त्यामुळे या केंद्रांना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे का, असा सवाल त्यांनी केला. जगभरात डेटा सेंटर्सना विरोध होत असताना महाराष्ट्रात त्यांच्यासाठी एवढा अट्टाहास का केला जात आहे? राज्यात आणखी किती डेटा सेंटर्स उभारण्याची सरकारची योजना आहे? या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नसल्याचा अनुभव जगभरात असतानाही त्यांना प्राधान्य का दिले जात आहे, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

पंप स्टोरेज प्रकल्प खरोखरच अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आहे का?

पंप स्टोरेज प्रकल्पाला अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प संबोधण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरही राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला. अशा प्रकल्पांमध्ये पाणी उंचावर नेण्यासाठी वीज खर्च करावी लागते. मग या प्रक्रियेत वापरली जाणारी वीज कुठून येणार, असा सवाल त्यांनी केला. या प्रकल्पासाठी स्वतंत्र सौरऊर्जा व्यवस्थेचा विचार करण्यात आला आहे का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासंदर्भातील आपले विधान तपासून घ्यावे, असे राज ठाकरे म्हणाले.

वृक्षतोडीपूर्वी पर्यायी जागांचा विचार झाला का?

कर्जत आणि भीमाशंकर परिसरातील झाडे तोडण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नव्हता का? प्रकल्पासाठी इतर कोणत्या पर्यायी जागांचा विचार करण्यात आला होता आणि अखेर याच जागेची निवड का करण्यात आली, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. इतक्या मोठ्या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामसभांमध्ये चर्चा झाली होती का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. हा आदिवासीबहुल भाग असल्याने येथे पेसा कायदा लागू होतो का आणि लागू होत असल्यास ग्रामसभांना कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा सन्मान राखण्यात आला आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामसभेपासून विधानसभेपर्यंत चर्चा झाली का?

प्रकल्प उभारताना संबंधित ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभेत चर्चा झाली होती का, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली असल्यास त्याचे तपशील स्थानिक नागरिकांना मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी वीजनिर्मिती झाल्यानंतर तिचे वितरण कसे केले जाणार, ही वीज महाराष्ट्रातील नागरिकांसाठीच वापरली जाणार आहे का आणि वितरणाची जबाबदारी कोणत्या यंत्रणेकडे असेल, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली. एकूणच, राज्याची ऊर्जेची गरज भागवताना पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिक नागरिकांचे अधिकार आणि प्रकल्पाच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता यांना महत्त्व दिले पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी कर्जत येथील सभेत मांडली.

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता...

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि २४ तास काम करण्याची परवानगी देणे अशा...

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत...

सत्तेचा अहंकार वाढला की मग त्याचा  ‘गोकुळ’ होतो : उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला

सत्तेचा अहंकार वाढला की मग त्याचा  ‘गोकुळ’ होतो : उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला

‘ही भारत-पाकिस्तानची लढाई नाही’; मित्रपक्षातील नेत्यांना सत्तेचा माज न बाळगण्याचा सल्ला, महायुतीला दिला घरचा आहेर सोलापूर : “जेव्हा सत्तेचा अहंकार वाढतो आणि ‘मी बोलेन तेच योग्य’ अशी भावना निर्माण होते, तेव्हा गोकुळ दूध संघासारखा निकाल लागतो,” अशा शब्दांत उद्योगमंत्री...