स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील 

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं योग्य नसेल. स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालल्या पाहिजेत, या संस्था मोडून काढणे योग्य नव्हे या शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली. गोकुळ अध्यक्ष निवडीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.

आमदार पाटील म्हणाले, गोकुळमध्ये आजचा कौल जो आहे तो १३ लोकांच्या बाजूने म्हणजेच बहुमताच्या बाजूनं आहे. त्यामुळे जो कौल लोकांच्या बहुमताच्या बाजूने आहे तो स्वीकारला पाहिजे. महायुतीचे १२ लोक जरी असले तरी ते अध्यक्ष निवडीच्या बैठकीला उपस्थित राहून आमचा चेअरमन होण्यासाठी मदत देखील करू शकतात. आज बुधवारी कॅबिनेटची बैठक आहे आणि त्यात काय होणार हे मला माहिती नाही. मात्र, असा काही निर्णय होऊ नये असा माझा प्रयत्न आहे. सहकारात हे संयुक्तिक नाही आणि योग्यही नाही. जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा परिषद, महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवक असेल. त्यांनाही मतदानाचा अधिकार दिला जाईल, पण हे संयुक्तिक नसल्याचे आमदार पाटील म्हणाले. साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळेच शशिकांत पाटील-चुयेकर अध्यक्ष होतील, असाही विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

विकास सेवा संस्थाही म्हणतील, आम्हाला नियम लावा… 
तीन हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या संस्थांना हे पत्र आहे. मग फक्त तीन हजार कोटीच का. उद्या विकास सेवा संस्था असतील, एखादी दुसरी संस्था असेल, इतरही संस्थांना नियम लावा असे सांगतील. मात्र, असे होणार नाही, या शब्दांत त्यांनी शासन नियुक्त केले जाणाऱ्या संचालकांच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय...

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात...

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...