महाराष्ट्राच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये १ हजार ६६ जागांची वाढ : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत पदव्युत्तर (Postgraduate Broad-Speciality) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत तब्बल १ हजार ६६ जागांची वाढ केली आहे. त्यामुळे येत्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण जागांची संख्या तब्बल ७ हजार ६१५ जागावर पोहोचली आहे. वैद्यकीय क्षेत्रात देशात कर्नाटकनंतर महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत नियोजनबद्ध पद्धतीने केलेले प्रयत्न तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास व पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांमुळे ही उल्लेखनीय वाढ साध्य झाल्याचे श्री मुश्रीफ यांनी नमूद केले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) ६ नोव्हेंबर रोजी अद्ययावत केलेल्या जागांच्या आकडेवारीनुसार, मागील शैक्षणिक वर्षातील जागांच्या तुलनेत यंदा १६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील राज्यनिहाय आकडेवारीत कर्नाटक ८,८६२ जागांसह प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र ७,६१५ जागांसह द्वितीय क्रमांकावर आहे.
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम.डी. व एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण ७२० अतिरिक्त जागांची भर पडली आहे.यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सर्वाधिक ७७ जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर – ७३, सातारा -६४, धुळे – ४४, तर अंबरनाथ येथे ४० जागांची वाढ झाली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ३९ नवीन ( एम.डी )जागांची वाढ झाली असून कोल्हापूरच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे या वाढीमुळे महाविद्यालयातील विविध वैद्यकीय विभागांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Amaron

Amaron

 

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर

* आरोग्य संवाद यात्रा आरोग्य विभागाच्या कामातील मैलाचा दगड ठरेल * राज्याच्या पर्यटन नकाशात राधानगरीची वेगळी ओळख निर्माण होईल * ग्रामीण रुग्णालयात 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर: भविष्यात राधानगरी ग्रामीण...

दिवाळीत सीपीआरची ओपीडी दोन दिवस बंद; आपत्कालीन सेवा सुरू

दिवाळीत सीपीआरची ओपीडी दोन दिवस बंद; आपत्कालीन सेवा सुरू

८ व १० नोव्हेंबर रोजी ओपीडी बंद; ९ व ११ नोव्हेंबर रोजी नियमित सुरू कोल्हापूर : दिवाळी सणानिमित्त सार्वजनिक सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथील बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) कामकाजात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ८ व १०...

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत...

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील...

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक...

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला  जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे...