पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंच्या ‘बाप’ वक्तव्याने वाद; भाजपचा जोरदार पलटवार

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पाटणा येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. ‘मोदी का बाप भी जायेगा’ (मोदींच्या वडिलांचाही पराभव होईल) असे वक्तव्य खरगे यांनी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एएनआयने (ANI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ‘मोदी नहीं जायेगा’ (मोदींचा पराभव होणार नाही) असे ओरडताना ऐकू येते. त्यावर प्रतिक्रिया देताना खरगे यांनी, ‘मोदी का बाप भी जायेगा… बाप भी जायेगा,’ असे प्रत्युत्तर दिले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला सभागृहाबाहेर नेले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना खरगे यांनी त्यांना ‘सवयीचे खोटारडे’ असे संबोधले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांना खोटे बोलण्याची सवय आहे. पहिल्या १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तो पैसा कुठे आहे, असा माझा प्रश्न आहे.”

भाजपचा खरगेंवर पलटवार

खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरगे यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. २०१४ पासून सातत्याने होत असलेल्या निवडणुकीतील पराभवांमुळे काँग्रेसमध्ये निराशा निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली. अमित शाह यांनी ‘एक्स’वरील (X) पोस्टमध्ये हिंदीत म्हटले की, “काँग्रेस पक्षाने मोदीजी किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत अपमानास्पद भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. कधी त्यांनी मोदीजींच्या पूजनीय मातेसंदर्भात अपमानास्पद वक्तव्ये केली, तर कधी त्यांना ‘मौत का सौदागर’ (मृत्यूचा व्यापारी) असे संबोधले. काही वेळा त्यांच्या साध्या पार्श्वभूमीची खिल्ली उडवत त्यांना ‘चायवाला’ म्हटले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस असभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहे.”

पुढे शाह म्हणाले, “गेल्या १२ वर्षांत सलग निवडणुकीतील पराभवांना सामोरे गेल्यामुळे काँग्रेस पक्ष निराशा आणि हताशेच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता सुसंगत धोरण किंवा ठोस मुद्दे उरलेले नाहीत. केवळ अपमानास्पद वक्तव्यांचे राजकारण सुरू आहे. जनतेचा पाठिंबा आधीच गमावलेली काँग्रेस आता स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांमधीलही पकड गमावत आहे.”

ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा; ‘इंडिया’ आघाडीची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा; ‘इंडिया’ आघाडीची मागणी

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशाच्या आत्म्यावर हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ‘इंडिया’ आघाडीतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या...

बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला एकही जागा नाही? पंतप्रधान मोदींचा खोचक सवाल

बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला एकही जागा नाही? पंतप्रधान मोदींचा खोचक सवाल

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले...

केंद्र सरकारकडून २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; ८२ टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून

केंद्र सरकारकडून २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; ८२ टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून

नवी दिल्ली : भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तिन्ही सैन्यदलांसाठी २.१२ लाख कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रां आणि आधुनिक लष्करी उपकरणांच्या खरेदी प्रस्तावांना सोमवारी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली....

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन कोटी मतदारांची नावे हटवल्याचा दावा, फॉर्म-६ वरून प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन कोटी मतदारांची नावे हटवल्याचा दावा, फॉर्म-६ वरून प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार यांनी महाराष्ट्रातील प्रारूप मतदारयादीतून तब्बल तीन कोटी मतदारांची नावे हटवण्यात...

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट

 २०२७ च्या प्रारंभी पोलंडच्या पंतप्रधानांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित बेंगळुरू : भारत दौऱ्यावर असलेले पोलंड देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची आज बेंगळुरू येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांचेमधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध...

पंतप्रधान मोदींच्या संभाव्य उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दसरा उत्सवासाठी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधान मोदींच्या संभाव्य उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दसरा उत्सवासाठी तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था

२,५०० सुरक्षा कर्मचारी तैनात; ड्रोनद्वारे नजर, वाहतुकीत बदल आणि निर्बंध लागू नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील दसरा उत्सवाला उपस्थित राहण्याची आणि रावण दहन कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व दिल्लीतील आयपी...