मिशन एड्स सुरक्षासाठी खाजगी डॉक्टर्सनी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा संपन्न

कोल्हापूर  : देशातील एचआयव्ही संसर्गितांचे आकडेवारी आटोक्यात आणण्यासाठी मिशन एड्स सुरक्षा अभियान देशभर चालू आहे. एच.आय.व्ही. चे 95:95:99 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न चालू असून जिल्ह्यातील खासगी डॉक्टर्सनी त्यांच्याजवळ एच.आय.व्ही. औषधोपचार घेत असणाऱ्या रुग्णांची सांख्यिकी माहिती शासनाला दिल्यास हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होणार असल्याने सर्व खाजगी डॉक्टर्सनी ही माहिती शासनास सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले. जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.यावेळी CPR च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा पाटील,जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.


प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदर मातांची एच.आय.व्ही. तपासणी व्हायला हवी,एड्स नियंत्रणामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आढावा घेण्यात यावा,जिल्ह्यातील नवीन एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी घटलेली असून ही बाब अतिशय चांगली असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले . मिशन एड्स सुरक्षा व इंडेक्स तपासणी अभियान प्रभावीपणे राबवावे त्याचबरोबर क्षयरोगाची तपासणी लवकरात लवकर केल्यास रुग्णाला त्याचा फायदा होणार असल्याने ही तपासणी करण्यावर भर देण्यात यावा अशी सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. तत्पूर्वी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाच्या कामाचा विस्तृत आढावा सांगून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नवीन एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी आटोक्यात येत असल्याची सांगितले.

या आढावा बैठकीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत रेवडेकर,डॉ. तेजल जाधव,क्षयरोग अधिकारी डॉ.रूपाली यादव,माहिती अधिकारी फारुख बागवान,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी-पाटील,क्लस्टर अधिकारी रमेश वर्धन,डॉ.ऋतुजा कदम,डॉ.वर्षा काळे,डॉ. सूर्यकांत खारगे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा जिल्हा बँकेतील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध; पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर कोल्हापूर : सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक म्हणून कार्यरत राहण्यासंदर्भातील निर्बंधांवर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी...

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपासून राज्यात मध्यम स्वरूपाच्या...

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू...

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली : जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच गत आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा विहित वेळेत वापर करून प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वी सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत पुणे: संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात...

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणातून सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे...