योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री : ‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन

-डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन

कोल्हापूर : योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री असल्याचे प्रतिपादन लॉरस लॅबचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यनारायण चावा यांनी केले डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित भारतीय आरोग्य यंत्रणेतील संधी आणि आव्हाने त्याचबरोबर हेल्दी एजिंग (सुदृढ वृद्धत्व)या विषयावर डॉ. चावा यांनी मार्गदर्शन केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी डॉ. चावा यांचे स्वागत केले. यावेळी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. चावा म्हणाले, सध्या भारतीय नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढत आहे, दुसरीकडे जन्मदर घटत आहे, हे आरोग्य क्षेत्रातील भारतासमोरच सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या देशात इतर देशाच्या तुलनेत डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडची संख्या कमी आहे. २०४७ मध्ये विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्य क्षेत्र, शिक्षण आणि संशोधन यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्थ केअर क्षेत्र झपाट्याने वाढत असून मेडिकल टुरिझमलाही मोठी संधी आहे. भविष्यात आरोग्य क्षेत्रात वेअरेबल डिव्हाईस, ई- कन्सल्टन्सी असे बदल होणार असून तंत्रज्ञानाचा वापर वाढून मानवी आरोग्य आणि जीवन अधिक सुलभ होईल. आरोग्य क्षेत्रातील संधी वाढतच जाणार असून विद्यार्थ्यानी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे.

‘हेल्थी एजिंग’वर बोलताना वय का वाढते, काय बदल होतात, बायोलॉजिकल बदल आदींविषयी सविस्तर माहिती दिली. एजिग हा आजार असून त्यावर कोणतेही औषध नाही. व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हीच आरोग्यमय दीर्घायुष्याची त्रिसूत्री आहे, असा कानमंत्र दिला. यावेळी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आय क्यू ए सी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. सी डी लोखंडे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, डॉ. अजित पाटील, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अर्पिता तिवारी यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत...

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सेवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरचे लोकार्पण कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील...

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक...

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक : सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ ला  जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे...

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

‘मॅपकॉन-२०२६’ परिषदचे डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवसीय परिषदेत एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्टचा सहभाग कोल्हापूर :  वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची...

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:  राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात...