गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग,सोमवारी संघर्ष मोर्चा

महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धार

कोल्हापूर : गोकुळच्या सत्तासंघर्षाची धग आता थेट रस्त्यावर पोहोचणार असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी झाली.

बैठकीत महायुतीवर गोकुळची सत्ता बळकावण्यासाठी कुटील राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चात कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान आणि ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हुकूमशाही मोडून काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढू, असा आक्रमक इशारा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला. ही लढाई केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, देशाची लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सुनील मोदी यांनी केले.

गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असून, कोल्हापुरातील कामगार, झेन-जी तरुण आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान उंचावावा, असे आवाहन आनंद माने यांनी केले. तर गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शासनाला काळा कायदा रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा सरलाताई पाटील यांनी दिला. काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.


बैठकीत जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, नगरसेवक सुनील मोदी, दुर्वास कदम, आनंद माने, सरलाताई पाटील, अमर पाटील, माजी नगरसेवक धनंजय सावंत आदींनी आपली भूमिका मांडली. बैठकीला महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक मधुकर रामाने, नगरसेविका ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, उदयानी साळुंखे, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, एम. आर. पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणवीर मोरे, भरत रसाळे आदी उपस्थित होते.

गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचे षड्यंत्र; आमदार सतेज पाटील यांचा महायुतीवर आरोप

गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचे षड्यंत्र; आमदार सतेज पाटील यांचा महायुतीवर आरोप

९ नोव्हेंबरला कोल्हापुरात ‘कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा’ काढणार कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी दिलेला कौल डावलून संघावर ताबा मिळवण्यासाठी राज्य सरकारने पाच शासकीय सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकशाही आणि सहकार क्षेत्राला...

फटाक्यांच्या ध्वनी मापनाची सायबर कॉलेज ग्राऊंडवर चाचणी

फटाक्यांच्या ध्वनी मापनाची सायबर कॉलेज ग्राऊंडवर चाचणी

कोल्हापूर : दिवाळी सणापूर्वी स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या ध्वनी मापनाची चाचणी सायबर कॉलेज ग्राऊंड येथे घेण्यात आली. सुट्टे फटाके, फटाक्यांच्या माळा यांसह विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता यावेळी मोजण्यात आली. विहित मर्यादेत असणाऱ्या...

हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकर माफ करणार नाहीत : आमदार सतेज पाटील

हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकर माफ करणार नाहीत : आमदार सतेज पाटील

गोकुळच्या अध्यक्षपदावरून चुयेकरांच्या वारसाला रोखण्याचा महायुतीचा डाव; निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देणार कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे. गोकुळचे शिल्पकार आनंदराव...

गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील

गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील

सांगली : गोकुळ दूध संघ आणि सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या कथित फसवणुकीविरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या सर्व संकटांवर निश्चितपणे मात करू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त...

स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील 

स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील 

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं योग्य नसेल. स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालल्या पाहिजेत, या संस्था मोडून...

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...