सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना; थकीत एफआरपी, गाळप हंगाम पूर्वतयारीसाठी मिळणार निधी

मुंबई : ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि आगामी २०२६-२७च्या गाळप हंगामातील पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता सॉफ्ट लोन योजनेस आणि त्यासाठीच्या अंदाजित ७३८.५१ कोटी रुपयांच्या व्याज अनुदानास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यात २०२५-२६ मधील गाळप हंगामात १०२ सहकारी साखर कारखान्यांनी ५२७.५१ लाख मे.टन ऊस गाळप केले आहे. मात्र साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि पुढील हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. त्यानुसार या योजनेस मान्यता देण्यात आली. यापूर्वी २०१५ व २०१९ मध्ये सॉफ्ट लोन योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांमध्ये वित्तीय संस्थांनी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासाठी व्याज अनुदान देण्यात आले होते.

Amaron

Amaron

केंद्र सरकारच्या २०१५ मधील योजनेत राज्य शासनाने सहभाग गेतला होता. यामध्ये केंद्र सरकारने एक वर्षाचे तर राज्य शासनाने त्यापुढील चार वर्षांकरिता द.सा.स.शे १० टक्के किंवा बँकेच्या प्रत्यक्ष व्याजदरापेक्षा जो कमी असेल त्यानुसार व्याज अनुदान दिले होते. या योजनेच्या धर्तीवर ही सॉफ्ट लोन योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पुढील सात वर्षांसाठी येणाऱ्या सुमारे ७३८ कोटी ५१ लाख रुपयांच्या व्याज अनुदानासही मंजुरी देण्यात आली.

या योजनेंतर्गत बँकांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंजुरी व वितरित केलेली रक्कम व्याज अनुदानास पात्र राहील. योजनेत मंजुरी झालेल्या कर्जाचा विनियोग प्रामुख्याने थकीत एफआरपीची रक्कम आदा करण्यास बंधनकारक असेल. थकीत रक्कम नसणा-या कारखान्यांना योजनेतील कर्जाचा वापर २०२६-२७ मधील पूर्वहंगामी कर्जासाठी करता येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी एक ऑक्टोबर २०२६ पासून पुढील सात वर्षांसाठी असेल; आणि याच कालावधीसाठी व्याज अनुदान देय राहील. द.सा.द.शे. १० टक्के किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यापैकी जो दर कमी असेल त्यानुसार व्याज अनुदान देण्यात येईल.

त्याचबरोबर कर्जाचा हफ्ता वेळेत न भरणाऱ्या साखर कारखान्यांना या योजनेतून तत्काळ वगळण्यात येईल आणि अशा कारखान्यांना पुढील कालावधीसाठी व्याज सवलत मिळणार नाही. यासाठी साखर कारखान्यांना जुलै २०२७ पर्यंत कर्जाबातचा विनियोग दाखला सादर करावा लागणार आहे. असा दाखला सादर करू न शकल्यास व्याज अनुदान मिळण्यास कारखाना अपात्र ठरेल.

मनोज जरांगे-पाटील यांचे २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित; मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत

मनोज जरांगे-पाटील यांचे २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित; मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आपले २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित केले आहे. आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. याच्या एक दिवस आधी, गुरुवारी दुपारनंतर मुंबईच्या दिशेने पुन्हा मोर्चा...

आता माघार नाही; पुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या मानेच राष्ट्रवादीचे उमेदवार : हसन मुश्रीफ

आता माघार नाही; पुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या मानेच राष्ट्रवादीचे उमेदवार : हसन मुश्रीफ

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून भैय्या माने यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. भाजपने ही जागा मागितली तरी राष्ट्रवादी ती सोडणार नसल्याचेही...

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महाराष्ट्रातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (RTE) प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील अशा सर्व अनुदानित...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफी

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना पथकरातून (टोल) सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार ही...

नवीन अणूऊर्जा प्रकल्पांमुळे स्वच्छ ऊर्जा निर्मितीत वाढ होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन अणूऊर्जा प्रकल्पांमुळे स्वच्छ ऊर्जा निर्मितीत वाढ होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प, ७९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ११ हजार ७०० रोजगार निर्मिती मुंबई : राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. अणुऊर्जा हा सक्षम आणि...

भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

कोल्हापूर : राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात...