‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळ गावागावांत पोहोचला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : देशातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असून, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळ ग्रामीण भागातील गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित 41 व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा (मुख्यमंत्री चषक) समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर जगताप, मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रिडा आयुक्त दीपक सांगला, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये बालेवाडी येथील क्रीडा संकुल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करून पदके मिळवत आहेत. राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून विविध खेळांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू केली आहेत. बास्केटबॉल हा महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ असून, राज्याने देशाला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभव आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी भारताने ४८ पदके मिळविली. विशेष म्हणजे १७ राज्यांतील खेळाडूंनी पदकांची कमाई केली. कबड्डी, नेमबाजी आणि तिरंदाजीसारख्या खेळांत सामान्य कुटुंबांतील खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविले. खेळाडूंची परिस्थिती नव्हे, तर त्यांची जिद्द, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची असते.

सर्व विजेत्या आणि सहभागी संघांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्राचा संघ यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी त्यातून निराश होण्याचे कारण नाही. खेळात जय-पराजय होत असतो. पुढील स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना मिळेल. खेळाडूंमध्ये जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि खिलाडूवृत्ती असणे महत्त्वाचे असून, पराभवानंतरही न थांबता प्रयत्न करणारे खेळाडूच भविष्यात विजयाचे मानकरी ठरतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध राज्यांतील संघांमधून भारताचे वैविध्य आणि एकात्मतेचे दर्शन घडते. दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यांचे खेळाडू एकत्र येऊन देशाच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

कुलविंदर सिंग गिल म्हणाले, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या माध्यमातून राज्यातील मुलांच्या आणि मुलींच्या संघांची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सातत्याने उंचावत असून, खेळाडू राष्ट्रीय पदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येत असलेल्या बास्केटबॉल स्टेडियममध्ये आगामी काळात राष्ट्रीय स्पर्धेबरोबरच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे विजेतेपदावर शिक्कामोर्तब

41 व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या (मुख्यमंत्री चषक) पारितोषिक वितरण समारंभात वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मुलींच्या गटात तामिळनाडूने, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात कर्नाटक संघाला उपविजेतेपद मिळाले. मुलांच्या गटात मध्य प्रदेश संघाने उपविजेतेपद मिळविले. यावेळी जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे याचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

मुंबई :  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीतील अजित आगरकर यांच्या जागी पाचव्या निवडकर्त्याची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे प्रज्ञान ओझा यांच्याकडे पूर्णवेळ मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

१४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व...

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४व्या दिवशी भारताने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत...

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर : पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स...

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल...

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...