ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर : पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अहमदाबाद, गुजरात येथे करण्यात आले आहे. विभागातील पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी केले आहे.

या आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवामध्ये योगासन खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा मान महाराष्ट्र राज्याला प्राप्त झाला आहे. या प्रात्यक्षिकासाठी महाराष्ट्र राज्यातून खुल्या गटातील 15 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष निवड चाचणी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी-महाळुंगे, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

Amaron

Amaron

या निवड चाचणीसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स यापैकी कोणत्याही एका स्पर्धेत पदक प्राप्त केलेले खेळाडू पात्र राहतील. तसेच 2026-27 या वर्षातील वरिष्ठ गट राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेले व संघटनेमार्फत नामनिर्देशित 10 खेळाडू देखील पात्र राहतील. पात्र खेळाडूंनी निवड चाचणीस उपस्थित राहताना मूळ क्रीडा प्रमाणपत्रे व आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

मुंबई :  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीतील अजित आगरकर यांच्या जागी पाचव्या निवडकर्त्याची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे प्रज्ञान ओझा यांच्याकडे पूर्णवेळ मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

१४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व...

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४व्या दिवशी भारताने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत...

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल...

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...

भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दहीहंडीच्या तयारीची झाली पाहणी, सुरक्षेचे सर्व नियम पाळत साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीनं दहीहंडी सोहळा...