यंदा शिवसेनेची ‘विकासाची भगवी दहीहंडी’ : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर 

दि.५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार 
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यामातून कोल्हापूरच्या विकासाला गती दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने  कोल्हापुरातील विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर नियंत्रण प्रकल्प, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, रंकाळा सुशोभिकरण, गांधी मैदानाचे काम, केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण या प्रमुख विकासकामांसह सर्किट बेंच, आय.टी.पार्क, महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम करणे अशा कामांमुळे कोल्हापूर नव्या रुपात परिवर्तीत होताना दिसत आहे.
Amaron

Amaron

आगामी काळातही असेच कोल्हापूरच्या विकासाचे थर रचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, यंदा शिवसेनेच्या वतीने “विकासाच्या भगव्या दहीहंडी” चा दि.०५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे थरार रंगणार असल्याची माहिती युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात  म्हटले आहे कि, महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने सर्व हिंदू उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दहीहंडी भव्यदिव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी शिवसेनेच्या “विकासाची भगवी दहीहंडी” चे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रु.१ लाख ११ हजार १११ इतके बक्षीस देण्यात येणार असून, इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तरी दहीहंडी स्पर्धेत जास्तीत जास्त गोंविंदा पथकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन  नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केले आहे.
सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...

भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला

भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दहीहंडीच्या तयारीची झाली पाहणी, सुरक्षेचे सर्व नियम पाळत साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीनं दहीहंडी सोहळा...

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; म्हणाला, ‘हा निर्णय माझ्या मनाला खोलवर दुखावणारा’

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; म्हणाला, ‘हा निर्णय माझ्या मनाला खोलवर दुखावणारा’

बार्सेलोना : अर्जेंटिनाचा फुटबॉलचा दिग्गज लिओनेल मेस्सी याने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. यासह ‘ला अल्बिसेलेस्ते’सोबतच्या त्याच्या तब्बल २१ वर्षांच्या अविस्मरणीय कारकिर्दीवर पडदा पडला आहे. ३९ वर्षीय मेस्सीने सोशल मीडियावर एक प्रदीर्घ आणि...

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या...

अनाया बांगरचे मारिझान कॅपच्या टिप्पणीवर प्रत्युत्तर, म्हणाली…  ‘स्वतःचे ज्ञान वाढवा’

अनाया बांगरचे मारिझान कॅपच्या टिप्पणीवर प्रत्युत्तर, म्हणाली… ‘स्वतःचे ज्ञान वाढवा’

मुंबई : ऑस्ट्रेलियात कम्युनिटी (स्थानिक) स्तरावर खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनाया बांगर आपला क्रिकेटचा प्रवास नव्याने सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजूनही तिला संघ मिळालेला नसला, तरी तेथे खेळून आणि चांगली कामगिरी करून पुढील वर्षी 'वुमेन्स बिग बॅश लीग' (WBBL)...

रोहितला गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज नाही ; २०२७ विश्वचषकाबाबत अजिंक्य रहाणेचे स्पष्ट मत

रोहितला गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज नाही ; २०२७ विश्वचषकाबाबत अजिंक्य रहाणेचे स्पष्ट मत

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न वारंवार चर्चेत आहे, तो म्हणजे रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार कि नाही? इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या निवृत्तीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र त्या निराधार ठरल्या. या...