भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दहीहंडीच्या तयारीची झाली पाहणी, सुरक्षेचे सर्व नियम पाळत साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीनं दहीहंडी सोहळा रंगणार आहे. तब्बल ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण झालीय. आज खासदार धनंजय महाडिक यांनी, दसरा चौक मैदानात जावून दहीहंडी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी केली. साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दहीहंडीमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील. तसेच या स्पर्धेतून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले जाईल, असे खासदार महाडिक म्हणाले.

Amaron

Amaron

धनंजय महाडिक युवा शक्तीच्यावतीने दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात दहीहंडीचे आयोजन केले जाते. ३ लाख रुपयांचे बक्षिस असणारी ही दहीहंडी, संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा शनिवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून, ऐतिहासिक दसरा चौकात युवा शक्तीचा दही-हंडी सोहळा रंगणार आहे. त्यासाठी दसरा चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली. मुख्य व्यासपीठाला लागून, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलीय. दोन क्रेनद्वारे सुमारे ४५ फुटांवर दहीहंडी टांगली जाईल. तर मानवी मनोर्‍यावरील सर्वात वरच्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी, समीट ऍडव्हेंचर आणि हिल रायडर फौंडेशनतर्फे सेफ्टी बेल्ट असणार आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची दहीहंडीला उपस्थिती असेल. आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दसरा चौक मैदानावरील दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली. युवा शक्ती दही-हंडी स्पर्धेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून अनेक गोविंदा संघांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण कार्यक्रम स्थळी उत्तम प्रकाशयोजना करण्यात आलीय. शिवाय दरवर्षीप्रमाणं यंदाही चॅनल बी वरुन दहीहंडीचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

सलामीपासून भरघोस बक्षिसे आणि मुख्य ३ लाखाचे बक्षिस असलेल्या युवा शक्ती दहीहंडीचे यंदाचे मानकरी कोण असणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. शिर्डी टीएमटी स्टील, राजारामपुरीतील बालाजी कलेक्शन आणि एस राजू माने प्रणित एस फोर ए टायगर्स प्रस्तुत स्मार्ट सिटी हे या दहीहंडी उत्सवाचे प्रायोजक आहेत. आजच्या पाहणीवेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक रिंकू देसाई, गोकुळचे माजी संचालक धैर्यशिल देसाई, किरण नकाते, उत्तम पाटील, इंद्रजित जाधव, संग्राम निकम, महेश पाटील, करण जाधव, भगवानराव काटे, अनिरुद्ध कोल्हापुरे, महेश माळगी, झाकीर जमादार, डॉ. आनंद गुरव, महेश वासुदेव, जयेश घरपणकर, अवधूत अपराध  उपस्थित होते.

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...

यंदा शिवसेनेची ‘विकासाची भगवी दहीहंडी’ : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर 

यंदा शिवसेनेची ‘विकासाची भगवी दहीहंडी’ : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर 

दि.५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार  कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यामातून कोल्हापूरच्या विकासाला गती दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री...

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; म्हणाला, ‘हा निर्णय माझ्या मनाला खोलवर दुखावणारा’

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; म्हणाला, ‘हा निर्णय माझ्या मनाला खोलवर दुखावणारा’

बार्सेलोना : अर्जेंटिनाचा फुटबॉलचा दिग्गज लिओनेल मेस्सी याने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. यासह ‘ला अल्बिसेलेस्ते’सोबतच्या त्याच्या तब्बल २१ वर्षांच्या अविस्मरणीय कारकिर्दीवर पडदा पडला आहे. ३९ वर्षीय मेस्सीने सोशल मीडियावर एक प्रदीर्घ आणि...

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या...

अनाया बांगरचे मारिझान कॅपच्या टिप्पणीवर प्रत्युत्तर, म्हणाली…  ‘स्वतःचे ज्ञान वाढवा’

अनाया बांगरचे मारिझान कॅपच्या टिप्पणीवर प्रत्युत्तर, म्हणाली… ‘स्वतःचे ज्ञान वाढवा’

मुंबई : ऑस्ट्रेलियात कम्युनिटी (स्थानिक) स्तरावर खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनाया बांगर आपला क्रिकेटचा प्रवास नव्याने सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजूनही तिला संघ मिळालेला नसला, तरी तेथे खेळून आणि चांगली कामगिरी करून पुढील वर्षी 'वुमेन्स बिग बॅश लीग' (WBBL)...

रोहितला गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज नाही ; २०२७ विश्वचषकाबाबत अजिंक्य रहाणेचे स्पष्ट मत

रोहितला गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज नाही ; २०२७ विश्वचषकाबाबत अजिंक्य रहाणेचे स्पष्ट मत

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न वारंवार चर्चेत आहे, तो म्हणजे रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार कि नाही? इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या निवृत्तीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, मात्र त्या निराधार ठरल्या. या...