दुष्काळी परिस्थितीत पाणी बचतीसाठी खोडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ करा

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून काही भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खोडवा व निडवा उसातील पाचट न जाळता ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन व रिकाम्या सरीत कडधान्य आंतरपीक’ या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड असून, त्यापैकी जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर खोडवा ऊस घेतला जातो. ऊस शेतीमध्ये पाचट व्यवस्थापन केल्यास कोणतीही अतिरिक्त आर्थिक गुंतवणूक न करता मोठ्या प्रमाणात पाणी बचत करता येते. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार उसाला हंगामानुसार हेक्टरी २.५० ते ३.५० कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. पारंपरिक पद्धतीने पाणी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

ऊसतोडणीनंतर शेतात शिल्लक राहणारे हेक्टरी १० ते १२ टन पाचट जाळण्याऐवजी एका सरीत व्यवस्थित दाबून रचावे आणि लगतची एक सरी पूर्णपणे मोकळी ठेवावी. त्यामुळे शेतातील ५० टक्के क्षेत्र पाचटाने आच्छादित राहते. पाणी देताना पाचट असलेली सरी वगळून केवळ मोकळ्या सरीत पाणी सोडावे. केशाकर्षणामुळे मोकळ्या सरीतील ओलावा पाचट असलेल्या सरीतील मातीत पोहोचतो.

मोकळ्या सरीत वैशाखी मूग, उडीद अथवा चवळी यांसारख्या कडधान्यांची पेरणी करावी. काढणीवेळी केवळ शेंगा तोडून पिकांचे अवशेष त्याच सरीत आच्छादन म्हणून कुजवावेत किंवा जनावरांच्या वैरणीसाठी वापरावेत. तसेच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मका, युतीफीड व रब्बी ज्वारी यांसारख्या चारा पिकांचीही लागवड करावी.

Amaron

Amaron

पाचट व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण फायदे

‘एक आड एक सरी’ पद्धतीने पाणी दिल्यास हेक्टरी सुमारे एक कोटी लिटर पाण्याची बचत होते. पाचट आच्छादनामुळे बाष्पीभवन मंदावून जमिनीत १२ ते १५ दिवस ओलावा टिकून राहतो. पाचट कुजल्यामुळे हेक्टरी पाच ते सहा टन उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विनाखर्च उपलब्ध होते. पाचटाच्या विघटनातून हेक्टरी ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद आणि ७५ ते १०० किलो पालाश यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.

रिकाम्या सरीत कडधान्याचे आंतरपीक घेतल्यास हेक्टरी सुमारे २.५ ते ३ क्विंटल उत्पादन मिळू शकते. त्यामुळे घरगुती गरज भागविण्याबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. पाचटाच्या आच्छादनामुळे तणांची वाढ कमी होत असल्याने निंदणी, खुरपणी व बगला फोडण्याच्या खर्चात एकरी दोन ते तीन हजार रुपयांची बचत होते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहून गांडुळांची संख्या वाढते आणि उसाच्या उत्पादनात हेक्टरी किमान १० ते १५ टक्के वाढ होऊ शकते. सलग तीन ते चार वर्षे दर्जेदार खोडवा पीक घेणेही शक्य होते.

पाचट जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन व धूर हवेत पसरून पर्यावरणाचे नुकसान होते. तसेच आगीच्या उष्णतेमुळे जमिनीतील गांडुळे, मित्रकीटक आणि उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन जमीन कडक व नापीक होण्याचा धोका असतो. पाचट लवकर कुजण्यासाठी तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी ट्रायकोडर्मा, ॲसिटोबॅक्टर आणि पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर करावा. जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, शेतकरी गट आणि ग्रामपंचायतींनी पाचट न जाळण्याबाबत जनजागृती करावी. शेतकऱ्यांनी या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यासाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

उसाला पहिली उचल ३,८०० रुपये देण्याचा कारखानदारांचा प्रस्ताव; शेतकरी संघटनेला अमान्य

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ऊस दराबाबत तोडगा काढणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शेतकऱ्यांची ऊस दराबाबत असणारी मागणी आणि साखर कारखानदार यांच्याकडून केंद्र सरकार मार्फत निश्चित केलेला रास्त व किफायतशीर दर यामध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रती टन ऊसाला योग्य...

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर...

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई  : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री...

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास : नांदेडमधील हृदयद्रावक घटना : दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली 

नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी...

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीच्या प्रचार साहित्यावर चुयेकरांचा फोटो का? आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला. आनंदराव पाटील-चुयेकर हे संस्थापकच नसल्याचे सांगितले जात असेल, तर महायुतीच्या प्रचार साहित्यावर...