पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

-डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली
-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली

कोल्हापूर :  शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे प्रतिमापूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात कुलपती तथा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा  नियंत्रक अभय जोशी, साळोखेनगरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी डॉ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदेच्यावतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ येथे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. आर. पावसकर, प्रा. डी. एन. शेलार यांच्यासह सर्व संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये प्रथम

-बंगळुरू येथील स्पर्धेत ‘रेलमार्ग’चा गौरव कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी(अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यानी बेंगळूरू येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली...

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! : डॉ. यशवंत पाटणे

-डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'भाग्यवान' आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे...

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी  ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल

-एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास -डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ...

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाचा सन्मान -कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूर येथील संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची दक्षिण कोरियाच्या प्रतिष्ठित ‘ब्रेन पूल फेलोशिप’ साठी निवड...

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला  ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ पुरस्कार

कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील " बेस्ट पॉलिटेक्निक" पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र - गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ अॅम्बेसेडर’मध्ये स्थान

-आय ट्रिपल ई कॉन्क्लेव्हमध्ये देदीप्यमान कामगिरी कोल्हापूर : बंगळुरू येथे झालेल्या इंस्टीटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय-ट्रिपल-ई) कॉन्क्लेव्हमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यानी टॉप...