महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; म्हणाला, ‘हा निर्णय माझ्या मनाला खोलवर दुखावणारा’

बार्सेलोना : अर्जेंटिनाचा फुटबॉलचा दिग्गज लिओनेल मेस्सी याने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. यासह ‘ला अल्बिसेलेस्ते’सोबतच्या त्याच्या तब्बल २१ वर्षांच्या अविस्मरणीय कारकिर्दीवर पडदा पडला आहे.

३९ वर्षीय मेस्सीने सोशल मीडियावर एक प्रदीर्घ आणि भावनिक निवेदन प्रसिद्ध करत आपल्या निर्णयाची पुष्टी केली. अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेल्यानंतर महिनाभरापेक्षा अधिक काळाने त्याने हा निर्णय जाहीर केला. अर्जेंटिनाने दोन कोपा अमेरिका विजेतेपदांसह २०२२ चा विश्वचषक जिंकला त्या काळातच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आपण राष्ट्रीय संघासाठी शक्य ते सर्व काही केले, असे मेस्सीने म्हटले. आता संघापासून दूर होण्याची वेळ आली आहे, याची जाणीव झाल्याचेही त्याने सांगितले.

मेस्सीने इन्स्टाग्रामवर लिहिले, “अंतिम सामन्यानंतर बराच काळ लोटला आहे. या निर्णयाचा खूप विचार केल्यानंतर मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेत आहे.” तो पुढे म्हणाला, “हा निर्णय घेताना मला खूप वेदना झाल्या आणि आजही मनाच्या खोलवर त्या वेदना आहेत. मात्र, आता वेळ आली आहे, हे मला समजते. मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की, मी नेहमीच माझे सर्वस्व दिले. फक्त अलीकडच्या काही वर्षांत, जेव्हा आम्ही सर्व काही जिंकलो, तेव्हाच नाही तर त्याआधीही. या जर्सीसाठी मी नेहमीच संघर्ष केला आणि मैदानावर माझे सर्वस्व पणाला लावले. फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला आनंद मिळावा आणि अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा, यासाठी मी नेहमी प्रयत्न केला.”

या निर्णयामुळे फुटबॉलच्या इतिहासातील एका महान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अंत झाला आहे. मात्र, मेस्सीने राष्ट्रीय संघातील नव्या पिढीच्या उदयाकडेही लक्ष वेधले. या युवा खेळाडूंना आता आपली संधी मिळायला हवी, असे त्याचे मत आहे.“वेळ कमी होत चालली आहे आणि प्रत्येक अध्यायाचा शेवट होतो. हा देखील माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी अध्याय आहे. मला राष्ट्रीय संघाचा भाग असणे आवडते, आवडत आले आहे आणि भविष्यातही ते मला कायम आवडत राहील. माझ्याकडे जे काही होते ते मी सर्व दिले आहे; आता देण्यासाठी माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. शिवाय, काही उत्कृष्ट युवा खेळाडू पुढे येत आहेत, जे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहेत,” असे त्याने म्हटले.

आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या शेवटी मेस्सीने खुलासा केला की, त्याने हे निवृत्तीचे निवेदन २१ जुलै रोजी, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा स्पेनकडून पराभव झाल्यानंतर दोन दिवसांनी लिहिले होते. मात्र, त्याचे वडील जॉर्ज मेस्सी यांच्या अलीकडील निधनामुळे हा निर्णय घेण्याबाबत तो आणखी ठाम झाल्याचे त्याने सांगितले. जॉर्ज मेस्सी यांचे ८ ऑगस्ट रोजी वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.

मेस्सीने लिहिले, “मी हे शब्द २१ जुलै रोजी, अंतिम सामन्यानंतर दोन दिवसांनी लिहिले होते. आज, माझ्या वडिलांसोबत जे काही घडले त्यानंतर, मी या निर्णयाबाबत पूर्वीपेक्षा अधिक ठाम आहे.” मेस्सीने २००५ मध्ये अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर तो देशाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने १२५ गोल केले आहेत. त्याने तब्बल सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, २०१४ आणि २०२२ मध्ये दोन वेळा गोल्डन बॉल जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने तीन विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांमध्ये सहभाग घेतला आणि कतारमध्ये झालेल्या २०२२ च्या विश्वचषकात अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून दिले.

२०२६ च्या अंतिम सामन्यातील निराशेनंतरही मेस्सीने राष्ट्रीय संघाचा निरोप अभिमान आणि समाधानाने घेत असल्याचे सांगितले. ज्या क्षणांचे स्वप्न त्याने कधीकाळी पाहिले होते, ते क्षण प्रत्यक्षात जगता आल्याचे त्याने नमूद केले.“आता मी तुमच्यापैकीच एक असेन. बाहेरून अर्जेंटिनाला प्रोत्साहन देत आणि पाठिंबा देत राहीन,” असे त्याने लिहिले. मेस्सीने आपल्या कुटुंबीयांचे, प्रशिक्षकांचे, सहकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ ज्या देशाचे प्रतिनिधित्व केले, त्या अर्जेंटिनासाठी त्याने आपल्या निवेदनाच्या शेवटी खास शब्द लिहिले.

 

“मला अर्जेंटिनाचा नागरिक बनवल्याबद्दल देवा, तुझे आभार.”

“चला, अर्जेंटिना!”

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा निवड समितीच्या उमेदवारांना सवाल

मुंबई :  भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीतील अजित आगरकर यांच्या जागी पाचव्या निवडकर्त्याची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे प्रज्ञान ओझा यांच्याकडे पूर्णवेळ मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

१४ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूल व...

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

ऐतिहासिक सुवर्णवेध! भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाचे पहिलेवहिले सुवर्णपदक

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४व्या दिवशी भारताने ऐतिहासिक सुरुवात केली आहे. महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकासह आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत...

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

कोल्हापूर : पारंपरिक व देशी खेळांना जागतिक व्यासपीठावर प्रोत्साहन देणे, क्रीडा सहभाग वाढविणे तसेच भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी वीर सावरकर स्पोर्ट्स...

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारताचा वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून दणदणीत विजय; विराट कोहली आणि शुभमन गिलची शतके

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल...

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

सुनील गावस्कर यांचा बीसीसीआयला सल्ला; सचिन, द्रविड, गांगुलीसह दिग्गजांच्या अनुभवाचा वापर करा!

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी, जे नेहमीच समजूतदारपणे मत मांडत असतात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीची (CAC) व्याप्ती आणि भूमिका वाढवण्याचे आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा व...