कर्णबधिरता प्रतिबंध, नियंत्रणाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

कोल्हापूर : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ निमित्त 24 सप्टेंबर रोजी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात यांनी नवजात बालकांमधील श्रवणदोषाची कारणे, श्रवणदोषाचे लवकर निदान व त्याचे महत्त्व तसेच सांकेतिक भाषेचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांचे भवितव्य अधिक सक्षम करता येते. याबाबत त्यांनी माहिती दिली. सांकेतिक भाषेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका सुरवसे, माने तसेच एनपीपीसीडी कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिलांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; कुटुंबाचा आर्थिक भार पेलत स्वावलंबनाची भरारी

महिलांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; कुटुंबाचा आर्थिक भार पेलत स्वावलंबनाची भरारी

म्हैसूर : एकेकाळी महिलांसाठी अनपेक्षित आणि आव्हानात्मक मानला जाणारा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आता म्हैसूरमधील अनेक महिलांसाठी स्वावलंबनाचा प्रभावी मार्ग ठरत आहे. कुटुंबातील पुरुषाचा, विशेषतः पतीचा आधार गमावल्यानंतर या महिलांनी रिक्षा चालवून स्वतःच्या कुटुंबाची...

सुंदरबनमध्ये मानव-वाघ संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ३३ स्वयंसेवकांमध्ये १० महिलांचा समावेश

सुंदरबनमध्ये मानव-वाघ संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ३३ स्वयंसेवकांमध्ये १० महिलांचा समावेश

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली भागात मानव-वाघ संघर्षाचे व्यवस्थापन आणि मानव-वाघ सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी ३३ नव्याने नियुक्त प्राथमिक प्रतिसाद पथकाच्या (PRT) सदस्यांना शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १० महिलांचा समावेश...

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

नवी दिल्ली : महिलांना पुरुषांच्या तुलनेत शरीराच्या विविध भागांमध्ये अधिक वेदना जाणवत असल्याचे एका मोठ्या जागतिक अभ्यासातून समोर आले आहे. ११८ देशांतील ६१ लाख २५ हजार ४५९ सहभागींच्या स्व-अहवालावर आधारित वेदनांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासानुसार, महिलांनी...

पारंपरिक दौण्याचे आकर्षक पॅकेजिंग; मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

पारंपरिक दौण्याचे आकर्षक पॅकेजिंग; मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीतून रोजगार निर्मितीचा प्रयत्न

स्थानिक परंपरेला उद्योजकतेची जोड; केकलेच्या महिलांचा अभिनव उपक्रम कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील केकले गावातील महिला स्वयंसहायता समूहाने स्थानिक परंपरेला उद्योजकतेची जोड देत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावात तयार होणाऱ्या आणि श्री क्षेत्र...

दुष्काळी परिस्थितीमुळे आदिशक्ती संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द : अध्यक्षा वेदांतिका माने यांची माहिती

दुष्काळी परिस्थितीमुळे आदिशक्ती संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द : अध्यक्षा वेदांतिका माने यांची माहिती

कोल्हापूर : सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन,आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवार ( दि.५)  रोजी आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका...

महिला व बाल विकास विभागातर्फे कायदेविषयक जनजागृती

महिला व बाल विकास विभागातर्फे कायदेविषयक जनजागृती

बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि हेल्पलाईन सेवांची माहिती कोल्हापूर : ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेतून प्रेरित सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालक व महिलांच्या संरक्षणासह कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका...