प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करता येतील. तसेच नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपले दावे व हरकती विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता...

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि २४ तास काम करण्याची परवानगी देणे अशा...

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत...