‘काँग्रेस अनेक दशकांपासून पराभूत’; SIR प्रक्रिया २०२४ नंतर सुरू झाली, राहुल गांधींच्या आरोपांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (SIR) अनियमिततेचे आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जोरदार टीका केली. काँग्रेस अनेक दशकांपासून विविध राज्यांमध्ये निवडणुका हरत आहे; मात्र पक्ष आपल्या पराभवाचे खापर SIR प्रक्रियेवर फोडत असल्याचा आरोप शाह यांनी केला.

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर शाह यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या निवडणूक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गांधीनगर महानगरपालिकेच्या ४४ जागांपैकी भाजपने ३८ जागा जिंकल्या, तर थारा आणि ओखा नगरपालिकांमध्येही पक्षाने बहुमत मिळवले. अमित शाह म्हणाले, “SIR प्रक्रिया २०२४ नंतरच सुरू झाली. तुम्ही काँग्रेसचे प्रमुख नेते बनल्यापासून, त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यापासून काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.”

‘त्रिपुरात ३३ वर्षांपासून काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही’

काँग्रेसच्या दीर्घकालीन निवडणूक पराभवांचा उल्लेख करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. “त्रिपुरामध्ये गेल्या ३३ वर्षांत काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री निवडून आलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला ५४ वर्षांपासून विजय मिळवता आलेला नाही. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला तीन, चार किंवा पाच दशकांपासून पराभवाचा सामना करावा लागत आहे. मग या पराभवांचे कारण SIR आहे का, असा प्रश्न मला राहुल गांधी यांना थेट विचारायचा आहे. SIR प्रक्रिया तर २०२४ नंतर सुरू झाली,” असे शाह म्हणाले. राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख नेते झाल्यापासून पक्षाला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचा दावाही त्यांनी केला.

पोटनिवडणुकांमधील विजयाचा भाजपकडून उल्लेख

पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मोठे यश मिळाल्याचा दावा अमित शाह यांनी केला. शाह यांच्या म्हणण्यानुसार, नौगावमध्ये भाजपच्या उमेदवाराने १ लाख ४२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आणि काँग्रेसकडून ही जागा जिंकली. नंदीग्राममध्ये भाजपच्या उमेदवाराला ७६ टक्के मते मिळाली आणि त्यांनी १ लाख २२ हजार मतांची आघाडी घेतली. पश्चिम बंगालमधील रेजिनगरमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसकडून जागा हिसकावून घेत ७५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवल्याचेही शाह यांनी सांगितले. पुद्दुचेरीमध्ये भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या AINRC च्या उमेदवाराने ८,४८२ मतांनी विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ २२ टक्के मते मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार : राहुल गांधी

दरम्यान, अमित शाह यांच्या वक्तव्याच्या काही वेळ आधी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भाजपवर टीका केली. देशातील लोकशाही प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला. SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततांवरून त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “काहीही झाले, कोणतीही संस्था या प्रक्रियेत सहभागी झाली किंवा नाही झाली, तरी राजकीय प्रतिकार सुरूच राहील. जनतेचा प्रतिकारही सुरू राहील आणि अखेरीस त्याचा विजय होईल.” या पत्रकार परिषदेत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) प्रमुख नेहा बोरा याही सहभागी झाल्या होत्या. भाजपला लोकशाही आणि संविधानाशी तडजोड करण्यास हरकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भारताच्या लोकशाहीच्या निर्मितीत भाजपची भूमिका नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा; ‘इंडिया’ आघाडीची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा; ‘इंडिया’ आघाडीची मागणी

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशाच्या आत्म्यावर हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ‘इंडिया’ आघाडीतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या...

बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला एकही जागा नाही? पंतप्रधान मोदींचा खोचक सवाल

बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला एकही जागा नाही? पंतप्रधान मोदींचा खोचक सवाल

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले...

केंद्र सरकारकडून २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; ८२ टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून

केंद्र सरकारकडून २.१२ लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; ८२ टक्के खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून

नवी दिल्ली : भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तिन्ही सैन्यदलांसाठी २.१२ लाख कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रां आणि आधुनिक लष्करी उपकरणांच्या खरेदी प्रस्तावांना सोमवारी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली....

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन कोटी मतदारांची नावे हटवल्याचा दावा, फॉर्म-६ वरून प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन कोटी मतदारांची नावे हटवल्याचा दावा, फॉर्म-६ वरून प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार यांनी महाराष्ट्रातील प्रारूप मतदारयादीतून तब्बल तीन कोटी मतदारांची नावे हटवण्यात...

पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंच्या ‘बाप’ वक्तव्याने वाद; भाजपचा जोरदार पलटवार

पंतप्रधान मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंच्या ‘बाप’ वक्तव्याने वाद; भाजपचा जोरदार पलटवार

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पाटणा येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. ‘मोदी का बाप भी जायेगा’ (मोदींच्या वडिलांचाही पराभव होईल) असे वक्तव्य खरगे यांनी केल्याचा...

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट

युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरूमध्ये भेट

 २०२७ च्या प्रारंभी पोलंडच्या पंतप्रधानांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित बेंगळुरू : भारत दौऱ्यावर असलेले पोलंड देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची आज बेंगळुरू येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांचेमधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध...