गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागाने शनिवारी (३१ ऑक्टोबर) यासंदर्भातील आदेश जारी केला. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला तिढा न्यायालयात पोहोचला असतानाच चौगुले यांच्या पदोन्नतीचा आदेश आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या आदेशात त्यांना सध्याचा कार्यभार तातडीने सोडण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.

चौगुले या निवडणुकीसाठी अधिसूचित पदावर कार्यरत असल्याने भारत निवडणूक आयोगाची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) पूर्ण होईपर्यंत त्या सध्याच्याच पदावर कार्यरत राहणार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच त्यांना पदोन्नतीच्या पदावर रुजू होता येणार आहे. त्यामुळे चौगुले यांना पदोन्नती आणि नवीन पदस्थापना मिळाली असली, तरी त्यांची सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्तता झालेली नाही. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या नव्या पदावरील नियुक्तीची अंमलबजावणी होणार आहे.

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय...

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात...

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नळ पाणीपुरवठा...