जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली : जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच गत आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा विहित वेळेत वापर करून प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वी सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) दत्तात्रय लांघी यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

हे ही वाचा… 

कर्करुग्ण उपचारासाठी ‘महाकेअर’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विविध विभागांना मंजूर झालेल्या निधीचा नियोजनबद्ध, पारदर्शक व दर्जेदार वापर करून विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. गत आर्थिक वर्षातील जी कामे अद्याप सुरू झाली नाहीत, ती कोणत्याही परिस्थितीत 15 ऑगस्टपूर्वी सुरू झाली पाहिजेत. निधी अखर्चित राहणार नाही यासाठी नियमित आढावा घेऊन कामांना गती द्यावी. दर्जेदार कामांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चालू आर्थिक वर्षात सामान्य नागरिकांच्या गरजा व जिल्ह्याचा सर्वंकष विकासाचे लक्ष ठेवून कामे प्रस्तावित करावीत. तसेच, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित सांगली जिल्हा 2047 साठी निधी राखीव ठेवून कामांचे नियोजन करावे. जिल्हा नियोजन विभागाशी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आपल्या विभागाच्या प्रस्तावित कामांची मंजुरी प्रक्रिया सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यावी. मंजूर कामे सुरू करण्यामध्ये पावसाळ्यानंतर अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुबार कामे टाळण्यासाठी प्रत्येक स्थायी कामास एमएचयुआयडी क्रमांक द्यावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मंजूर निधीचा वापर शासनाच्या उद्दिष्टांनुसार व पात्र लाभार्थ्यांच्या हितासाठी प्राधान्याने करावा. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखत लाभ वेळेत मिळेल याची काळजी घ्यावी. प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढून निधी खर्चाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, नगरपालिका स्तरीय यंत्रणा तसेच राज्यस्तरीय यंत्रणांकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा विभाग व  योजनानिहाय आढावा घेण्यात आला. मंजूर कामांची सद्यस्थिती, निधी खर्च, प्रलंबित कामे, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सुरू असलेली कामे आणि निधी खर्चाचा आढावा सादर केला. विविध विभागांकडून प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

 

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहकारी बँकांमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर राहणाऱ्यांना धक्का; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा जिल्हा बँकेतील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध; पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संचालकांच्या पात्रतेचा प्रश्न ऐरणीवर कोल्हापूर : सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक म्हणून कार्यरत राहण्यासंदर्भातील निर्बंधांवर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी...

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

दिलासादायक बातमी… राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २२ जुलैपासून मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपासून राज्यात मध्यम स्वरूपाच्या...

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर; पुढील टप्पा धोकादायक ठरू शकतो : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा सेवाभावी उपक्रम

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत पुणे: संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वारकर्‍यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात...

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

एसटीच्या राज्यातील सुमारे ८५० ठिकाणी ३५०० एकर जागांचा पीपीपी धोरणातून विकास

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणातून सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे...

FDA विभागाच्या धडक कारवाया अधिक कठोरपणे सुरू राहणार; नियमांशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही : तुकाराम मुंढे

FDA विभागाच्या धडक कारवाया अधिक कठोरपणे सुरू राहणार; नियमांशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही : तुकाराम मुंढे

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाया यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असून, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्न व औषध...