कर्करुग्ण उपचारासाठी ‘महाकेअर’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सचिव विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार व सदस्य डॉ. कैलाश शर्मा, नवीन खत्री, उपसचिव तथा सदस्य संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्य-शासित एल 2 व एल 3 कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला निदानापासून उपचारापर्यंत समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाकेअर कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील कर्करुग्णांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाकेअरसाठी मनुष्यबळ उभारताना उच्च दर्जाची क्षमता असलेले मनुष्यबळ घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

महाकेअर अंतर्गत नागपूमध्ये ‘नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ या उपकंपनीची स्थापना करण्यास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.  महाकेअर कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी 100 कोटी रुपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारण्यास व स्वीकारणे, महाकेअरच्या कार्यालयासाठी जी.टी.रुग्णालय येथील इमारतीत जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचे लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती करणे, सल्लागार नेमणे आदी विषयांनाही संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऑटोमिक एनर्जीची पूर्व मान्यता घेण्याची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. यावेळी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबरोबर तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. टाटा मेमोरियलचे खत्री व महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंदनवाले यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

महाकेअरची व्याप्ती

– महाकेअर कंपनीमार्फत विकेंद्रीत सेवा प्रणालीद्वारे कर्करोर उपचार पद्धतीत परिवर्तन होणार आहे.

– याअंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सर्वोच्च संशोधन व कर्करोग उपचार केंद्र,

– मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक व अमरावती येथे जिल्हास्तरीय सर्वसमावेश कर्करोग उपचार केंद्रे

– मुंबई (कामा आल्ब्लेस), रत्नागिरी, सातारा, बारामती, जळगाव, यवतमाळ, अंबाजोगाई (बीड), ठाणे व शिर्डी येथे निदान व डे-केअर केंद्रांची उभारणी

– महाआरोग्य प्रकल्प माध्यमातून राज्यव्यापी अंमलबजावणी

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता...

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि २४ तास काम करण्याची परवानगी देणे अशा...

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत...